Ved Marathi Movie Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ved Movie: रितेश-जेनेलियाच्या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, मनसे करणार 'वेड'च्या हाऊसफुल्ल पाटीचा दुग्धाभिषेक

'वेड' चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे चित्रपटाचा सत्कार करणार आहेत.

श्रेयस सावंत

MNS Special Show Of Movie Ved: रितेश देशमुख आणि जेनेलियाच्या 'वेड' चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे. चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षक तुफान गर्दी करत आहेत. 'वेड' चित्रपटाला मिळालेल्या या प्रतिसादामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे या चित्रपटाचा सत्कार करणार आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेद्वारा 'वेड' या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष शोला रितेश आणि जेनेलिया देखील उपस्थित राहणार आहेत. मनसे नेते अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्याकडून रितेश आणि जेनेलिया यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच 'वेड' चित्रपटाच्या 'हाऊसफुल्ल' या पाटीचा दुग्धाभिषेक केला जाणार आहे.

'वेड' चित्रपटाने बॉलिवूडच्या चित्रपटांना देखील मात दिली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशीच २ कोटी २५ लाख रुपये कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी ३ कोटी २५ लाख रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने आज तब्बल ३३ कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाची कमाई आणि यश पाहून सगळे चकित झाले आहेत. अनेक दिवसांनी बॉक्स ऑफिस मराठी चित्रपटाला इतके यश मिळाले आहे.

'वेड' चित्रपट रितेश देखमुखसाठी खूप खास आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रितेश दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. तसेच दिवाळीच्या मुहूर्तावर त्याने या चित्रपटाची घोषणा केली होती. जेनेलियाने सुद्धा या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुमच्या माशांवर केमिकल स्प्रे? तुम्ही खाताय केमिकल मासे?

Maharashtra Live News Update: कळमेश्वर MIDC मध्ये बोगस युरिया बनविणाऱ्या कंपनीवर कृषी विभागाचा छापा

कालव्यात पोहोयला गेले पुन्हा परतलेच नाही; पाण्यातील सिमेंट पाईपमध्ये अडकून ३ तरुणांचा मृत्यू

निवडणूक हरल्याचा राग, ठाकरेंच्या नेत्याचा देवेंद्र शिंदेंवर कोयत्याने प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

प्रसिद्ध अभिनेत्रीची प्रायव्हेट ऑडिओ क्लिप व्हायरल; सोशल मीडियावर पोस्ट करत दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

SCROLL FOR NEXT