Anicka Vikhraman Photo Facebook Anicka Vikhraman
मनोरंजन बातम्या

Boyfriend Beats Actress : चेहरा सुजला, काळानिळा पडला... मल्याळम अभिनेत्रीला एक्स बॉयफ्रेंडकडून मारहाण आणि धमकी

एक्स बॉयफ्रेंडने अनूप पिल्लईने तिला मारहाण केल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे

Pooja Dange

Anicka Vikhraman Accuses By Ex-Boyfriend: मल्याळम अभिनेत्री अनिका विक्रमनने तिच्या प्रियकरावर शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनेत्रीने ही माहिती शेअर केलाय आहे. सोशल मीडियावर तिने तिच्या चेहऱ्यावर झालेल्या जखमांचे फोटो शेअर केले आहेत. एक्स बॉयफ्रेंडने अनूप पिल्लईने तिला मारहाण केल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे. तिने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सध्या, या बातमीकडे सर्वांचे लक्ष आहे. अनिकाच्या जखमी चेहऱ्याचा फोटो व्हायरल होत आहे.

अनिकाने तिच्या फेसबुक हँडलवर तिच्या चेहऱ्यावरील जखमांची काही फोटो शेअर केले आहेत. तसेच तिने सांगितले आहे की तिचा एक्स बॉयफ्रेंड तिचा छळ करत होता. तिने लिहिले की, "मी अनूप पिल्लई नावाच्या व्यक्तीच्या प्रेमात होते.

गेल्या काही वर्षांपासून त्याने माझे मानसिक आणि शारीरिक शोषण केले आहे. असा माणूस कधीच पाहिला नाही. हे सर्व केल्यानंतर तो मला धमकावत आहे. मला कधीच स्वप्नात देखील वाटले नव्हते की तो माझ्याशी असे वागेल. दुसऱ्यांदा त्याने मला मारहाण केल्यानंतर मी बेंगळुरूमध्ये पोलिसांत तक्रार दाखल केली. चेन्नईमध्ये त्याने मला पहिल्यांदा मारहाण केली तेव्हा तो माझ्या पाया पडला आणि रडला."

अनिकाने सांगितले की तिने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली पण तो पोलिसांना काहीतरी सांगून प्रकरण बाहेर येऊ दिले नाही. अभिनेत्रीने सांगितले की, तो नेहमी तिचे चॅट्स, लॅपटॉप आणि इत्यादींवर लक्ष ठेवून असायचा. अनिकाने तिच्या पोस्टमध्ये सांगितले आहे की, अनुपने तिला विनवणी केल्यानंतर तिने त्याला माफ करून मूर्खपणा केला. परंतु नंतर चेन्नईमध्ये पोलिसांकडे गेले तेव्हा त्याने अनिकाला समजावले आणि मला आणखी मारहाण केली. .

अनिका पुढे म्हणाली, "याच्या पुढे जाणून तो मला धमकीचे कॉल करत आहेत, मला आणि माझ्या कुटुंबाला सतत बदनाम केले जात आहे. माझ्या एक्स बॉयफ्रेंडने मला मारहाण करण्यापूर्वी मी शेवटचा फोटो क्लिक केला होता. माझा हेअर कट दाखवण्यासाठी मी खूप उत्सुक होते. आता तो भूतकाळ आहे. मी या आठवड्यापासून माझे फोटो पोस्ट करणे सुरू करेन. मी आता पूर्णपणे बारी झाले आहे, मी शूट करण्यास सुरुवात केली आहे. आता सर्वकाही ठीक होईल अशी अशा करते."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : मोठी बातमी: मुंबईत भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात, फ्री वे वर ३ वाहनांना धडक

Maharashtra News Live Update: रोहित पवारांचा दुष्काळी दौरा; ‘काजू-बदाम खाऊन तरी बुद्धी चालवा’, सरकारवर जोरदार टीका

मोठी बातमी! मिरजमध्ये सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळला; 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले, 2 जणांचा मृत्यू

8th Pay Commission Update: 3.25 फिटमेंट फॅक्टरची मागणी चर्चेत; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट

Actress Death: चित्रपटसृष्टीला मोठा धक्का; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

SCROLL FOR NEXT