Pujappura Ravi Passes Away At Age 86  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pujappura Ravi Death: ज्येष्ठ मल्याळम अभिनेते पूजापुरा कालवश, ८०० हून अधिक सिनेमात केलं होतं काम...

Pujappura Ravi Passes Away: मल्याळम चित्रपटसष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पूजापुरा रवी यांचे निधन झाले आहे.

Chetan Bodke

Pujappura Ravi Passes Away At Age 86 तमिळ फिल्म इंडस्ट्रीला आणखी एक धक्का बसला आहे. आणखी एका अभिनेत्याच्या निधनामुळे तमिळ फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ अभिनेते पुजापुरा यांचे निधन झाले आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी इडुक्की जिल्ह्यातील मरूर येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याच्या निधनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटी शोक व्यक्त करत आहेत.

डिसेंबर २०२२ मध्ये अभिनेता तिरुअनंतपुरमहून इडुक्की येथील त्याच्या निवासस्थानी राहण्यासाठी गेले होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. वृद्धापकाळामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.

अभिनेते पुजापूरा रवीच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अंत्यसंस्काराबद्दल अद्याप कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. पूजापुरा रवी यांनी आपल्या सिनेकारकिर्दित ८०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांचा शेवटचा चित्रपट ‘गप्पी’ होता, त्या चित्रपटात पूजापुरा यांच्यासोबत प्रसिद्ध मल्याळम अभिनेता टोविनो थॉमस मुख्य भूमिकेत होता.

पूजापुरा यांनी आपल्या सिनेकारकिर्दीची सुरुवात दिवंगत एन.के. आचार्य यांच्या नाटक मंडळी कलानिलयमपासून केली होती. मल्याळम थिएटरमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक पूजापुरा एक होते. त्यानंतर रवी यांनी अनेक चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकरल्या आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाफेडने मांडला कांदा खरेदीचा खेळ; पहिल्याच दिवशी फज्जा, बळीराजाची थट्टा

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT