C V Dev Death Saam Tv
मनोरंजन बातम्या

C V Dev Death: दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा, ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन; मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

C V Dev Dies: मल्याळम ज्येष्ठ अभिनेते सी.व्ही.देव यांचे निधन झाले आहे.

Chetan Bodke

C V Dev Passed Away: टॉलिवूड इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. मल्याळम अभिनेते सी.व्ही.देव यांचे निधन झाले आहे. अभिनेत्याने वयाच्या ८३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कोझिकोडमधील मेडिकल कॉलेजमध्ये वृद्धापकाळामुळे त्यांना काही आजार जडले होते. संबंधित आजारांवर उपचार सुरू असताना त्यांची आज प्राणज्योत मालवली.

अभिनेता सीव्ही देव यांनी १०० हून अधिक चित्रपट आणि अनेक नाटकांमध्ये काम केले असून अभिनेत्याच्या निधनामुळे टॉलिवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

अभिनेता सी.व्ही.देव यांची सिनेसृष्टीत विनोदी भूमिकेकरिता खास ओळख देखील निर्माण झाली होती. देव यांचा जन्म १९४० मध्ये केरळ येथील एका छोट्या गावात झाला आहे. देव यांनी १९५९ मध्ये 'विलाक्किन्ते वेलीचाथिल' या मल्याळम नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. गेल्या अनेक दशकांपासून ते इंडस्ट्रीत सक्रिय होते.

सीव्ही देव यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कुटुंबातील एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सी.व्ही.देव वयोमानानुसार आजारी होते. नुकतीच त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीव्ही देव यांची हृदयासंबंधित आजाराशी ते झुंज देत होते. त्यांच्यावर कोझिकोडयेथील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी ज्येष्ठ अभिनेते सी.व्ही.देव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सी.व्ही.देव यांनी 'साध्याम', 'ई पुझायुम कदन्नू', 'मिझी रांडीलम', 'चंद्रोलसवम' चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. एकूणच एक दिग्गज अभिनेता आपल्यातून गेल्यामुळे दाक्षिणेतील अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT