Malaika Arora Father Suicide Malaika Arora Father Suicide
मनोरंजन बातम्या

Malaika Arora father : मलायका अरोराच्या वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण अस्पष्ट!

Malaika Arora's father Anil Arora Death: अभिनेत्री मलायका आरोरा हिच्या वडिलांनी आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आले आहे. पोलिसांचा तपास सुरु आहे.

Namdeo Kumbhar

Malaika Arora Father Anil Arora Suicide : बॉलिवूडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री मलायका आरोरा हिच्या वडिलांनी आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आले आहे. वांद्रे येथील इमारतीवरून उडी घेत त्यांनी आयुष्य संपवलं. आत्महत्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

मलायका आरोरा यांचे वडील अनिल अरोरा यांनी वांद्रे येथील इमारतीच्या टेरीसवरुन उडी घेत आत्महत्या केली. आरोरा कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. अनिल आरोरा यांनी टोकाचं पाऊल का उचलले? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

कधी घडली घटना ?

या घटनेमुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अभिनेता अरबाज खान हा सध्या अरोरा कुटुंबासोबत आहे.

आत्महत्याचं कारण अस्पष्ट, पोलिसांचा तपास सुरु?

वांद्रे येथील अल्मेडा पार्क या इमारतीच्या टेरिसवरुन अनिल अरोरा यांनी उडी घेत आयुष्य संपवल्याचं समोर आलेय. अनिल आरोरा यांनी आत्महत्या का केली? हे अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांना घटनास्थळावर कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. पोलिसांनी अनिल अरोरा यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोलिस याप्रकऱणाचा कसून तपास करत आहेत.

मलायका पुण्याहून मुंबईसाठी रवाना

अभिनेत्री मलायका आरोरा कामानिमित्त पुण्याला गेली होती. वडिलांच्या निधनाबाबतची माहिती मिळताच तातडीने ती मुंबईसाठी रवाना झाल्याचं समजतेय. त्याशिवाय अनिल अरोरा यांच्या निधनाची माहिती मिळताच अरबाज खान तात्काळ अरोरा कुटुंबियांच्या घरी दाखल झालाय. अरबाज खान अरोरा कुटुंबांना धीर देण्यासाठी गेल्याचं समजतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT