Malaika Arora Saam Tv
मनोरंजन बातम्या

HBD Malaika Arora: आलिशान घर, लग्जरी कार कलेक्शन; अर्जुन कपूरची गर्लफ्रेंड मलायका आहे कोट्यवधींची मालकीण

Malaika Arora Birthday: अभिनेत्री मलायका अरोराचा आज ५० वा वाढदिवस आहे.

Pooja Dange

Malaika Arora Net Worth:

अभिनेत्री मलायका अरोराचा आज ५० वा वाढदिवस आहे. मलायकाचा जन्म २३ ऑक्टोबर १९७३ साली झाला. मलायका तिच्या फॅशन आणि फिटनेसमुळे नेहमी चर्चेत असते.

मलायकाचा फॅशन सेन्स कमाल आहे. मलायका प्रत्येक लूक पाहूण चाहते तिच्या प्रेमात पडतात. आज मलायकाच्या वाढदिवशी आपण तिच्या फॅशन किंवा सौंदर्याविषयी बोलणार नसून तिच्या आलिशान जीवन शैलीविषयी जाणून घेणार आहोत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मलायकाने अनेक चित्रपटांमध्ये आयटम सॉंग केले आहेत. त्यामुळे चित्रपटांना यशस्वी होण्यास मदत झाली आहे. ती टीव्हीवरील डान्स शोमध्ये परीक्षक म्हणून देखील काम करते. यासगळ्याची मलायका बक्कळ फी घेते.

रिपोट्सनुसार मलायका एका शोसाठी ५ लाख रुपये आकारते. मलायका अनेक कंपन्यांच्या जाहिराती देखील करते. त्यासाठी देखील भरपूर मानधन घेते. मलायका १०० कोटींची मालकीण आहे. (Latest Entertainment News)

आलिशान घर

मलायकाचे स्वःताचे अलिशान घर आहे. मलायकाच्या घराची किंमत २० कोटी रुपये आहे. मलायकाच्या घरातून अरबी समुद्राचा सुंदर नजारा दिसतो. एका रिअॅलिटी शो दरम्यान मलायकाच्या घराची झलक देखील दाखविण्यात आली होती.

कार कलेक्शन

मलायका अरोराला लग्जरी कारची देखील आवड आहे. तिच्याकडे Mercedes-Benz S-Class, Range Rover Vogue, Audi Q7, आणि BMW 7 Series या कार आहेत.

मलायकाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले तर ती आणि अर्जुन कपूर सध्या एकमेकांना डेट करत आहेत. काही दिवसांपूर्वी दोघांचा ब्रेकअप झाला असल्याची चर्चा होती. परंतु त्यानंतर दोघे एकत्र एका कार्यक्रमात स्पॉट झाले. त्यानंतर या चर्चंना पूर्णविराम लागला.

मलायका आणि अरबाज खान यांनी १९९८ साली लग्न केले होते. २०१७ साली लग्नाच्या १८ वर्षांनी अरबाज, मलायका घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले. या दोघांना अरहान नावाचा मुलगा आहे.

मलायका अरोरा तिच्या डान्ससाठी ओळखली जाते. शाहरुख खानच्या 'बॉम्बे' चित्रपटातील 'छय्या छय्या' या गाण्याने मलायका ओळख मिळवून दिली. तिचे हे गाणे आजही खूप प्रसिद्ध आहे. त्यासह मलायकाने 'मुन्नी बदनाम हुई', 'अनारकली डिस्को चली' ही गाणी खूप लोकप्रिय आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT