Malaika Arora Celebrate Onam Saam Tv
मनोरंजन बातम्या

Malaika Arora Onam Celebration: पारंपारिक लूक अन् अभिनेत्रीचे निस्सिम सौंदर्य, मलायकाने साजरा केला खास अंदाजात ‘ओणम’

Malaika Arora News: ‘ओणम’ हा सण बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिनं तिच्या परिवारासोबत साजरा केला आहे.

Chetan Bodke

Malaika Arora Celebrate Onam

दक्षिण भारतातील मुख्य सणांपैकी एक समजला जाणारा ओणम सण २९ ऑगस्टपासून अर्थात आजपासून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हा सण अवघ्या भारतात १० दिवस साजरा केला जातो. या वर्षी हा सण २० ऑगस्टपासून सुरू झाला आहे. सध्या या सणाची क्रेझ सेलिब्रिटींमध्ये ही दिसून येत आहे. नुकतंच ‘ओणम’ हा सण बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिनं तिच्या परिवारासोबतसण साजरा केला आहे, सोबतच यावेळी अभिनेत्रीच्या लूकचीही तुफान चर्चा होते.

कायमच लाईमलाईटमध्ये राहणारी मलायका यावेळी एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. मध्यंतरी अभिनेत्रीच्या आणि अर्जुन कपूरच्या ब्रेकअपची तुफान चर्चा सुरू असताना, एका वेगळ्याच कारणासाठी आता अभिनेत्री चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने नुकताच तिच्या फॅमिलीसोबत ‘ओणम’ सण साजरा केला आहे. या सणाचं खास सेलिब्रेशन करण्यासाठी मलायका अरोराची बहीण अमृताच्या घरी ओणम सणाचं सेलिब्रेशन करण्यासाठी गेले होते. मलायका, मैत्रिण करीना कपूर सोबत ती सण साजरा करत दिसली. सोबतच, मलायकाची आई जॉयस अरोराने तिच्या घरी मैत्रिणींसोबत लंचचे आयोजन केले होते.

अभिनेत्रीच्या लूकबद्दल बोलायचे तर, यावेळी अभिनेत्री खूप खास लूकमध्ये स्पॉट झाली होती. ओणम या सणाच्या निमित्ताने अनारकली सूट, त्यावर दुपट्टा, कपाळावर टिकली लावून ती कॅमेऱ्यासमोर स्पॉट झाली. यावेळी मलायकाने सनग्लासेस लावत तिचा हा लूक पूर्ण केला. सोबतच तिने तपकिरी रंगाची बॅगही हातात घेतली होती. मलायकाचा हा लूक चाहत्यांच्या पसंदीस पडला आहे. अभिनेत्रीचा हा पारंपारि लूक इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. (Fashion)

सध्या देशभरामध्ये सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वच नागरिक ‘ओणम’ हा सण साजरा करत आहेत. अभिनेत्रीच्या सेलिब्रेशनची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT