Malaika Arora 2nd Wedding Instagram
मनोरंजन बातम्या

Malaika Arora 2nd Wedding: ‘मला वेड लागले लग्नाचे...’; अर्जुन कपुरसोबतच्या लग्नाबाबत मलायकाने केला मोठा खुलासा

बॉलिवूडची स्टायलिश अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर हे एकमेकांना अनेक वर्षांपासून डेट करत आहेत.

Chetan Bodke

Malaika Arora And Arjun Kapoor: बॉलिवूडची स्टायलिश अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर हे एकमेकांना अनेक वर्षांपासून डेट करत आहेत. सोबतच ते अनेकदा एकत्र फिरतानाचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले होते. या जोडीने एकमेकांना डेट करत सोशल मीडियावर आपलं प्रेम व्यक्त करताना दिसले होते.

मध्यंतरी ही जोडी लग्न बंधनात अडकणार अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. पण अर्जुनने आम्ही अजूनही लग्न करण्याचा विचार केला नाही असं म्हणत सर्व चर्चा धुडकावल्या. अशातच पुन्हा एकदा या जोडीने एका मुलाखतीत लग्नाबद्दल मोठी अपडेट दिली आहे.

मलायका व अर्जुन एकमेकांच्या प्रेमामध्ये नेहमीच आकंठ बुडालेले होते. खुलेपणाने ते एकमेकांवर आपलं प्रेम व्यक्त करताना सर्वांनीच कदाचित पाहिलं असेल. आता मलायकाने तिच्या दुसऱ्या लग्नाबाबत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला आहे. आता मात्र चाहते मलायका आणि अर्जुनच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्यांची चर्चा सुरु आहे.

मलायकाने ब्राइड्स टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाली की, “सध्या आम्ही दोघंही लग्नाचा विचार करत आहोत. आमचे एकमेकांवर प्रेम असून आमच्या प्रेमावर आम्हाला पुर्ण विश्वास आहे. पण आम्ही दुसरं लग्न कधी करणार? याचं उत्तर आता देऊ शकत नाही. कारण मला काही गोष्टी सरप्राइज म्हणून ठेवायच्या आहेत.”

अर्जुन कपूरच कौतुक करताना मलायका अरोरा म्हणते, 'तो वयाप्रमाणे मॅच्युअर्ड होत आहे. त्याचं वय जरी लहान असलं तरी, त्याचं मन खूप मोठं आहे. नेहमीच तो माझी खुप काळजी घेतो, माझ्या आयुष्यातील तो मोस्ट केअरिंग पर्सन आहे. तो मनाने खूप शांत असून कणखर मनाचा माणूस आहे. खुल्या विचारांसोबतच तो खूप काळजीही घेतो. लग्न कधी होईल हे सांगता येत नाही. कारण आयुष्याबद्दल फारसे नियोजन नसावे असे माझे मत आहे. आयुष्याबद्दल खूप नियोजन केल्याने आयुष्यातील मजा खराब होते.' मलायका अरोरा 49 वर्षांची असून अर्जुनचे वय 37 वर्ष आहे.

मलायका आणि अरबाज खान यांनी २०१७मध्ये एकमेकांपासून घटस्फोट घेतला होता. मलायकाने घटस्फोटानंतर अर्जुनला डेट करायला लागली. मुळात ते दोघेही एकमेकांना डेट करत होते. आता दोघंही लवकरच लग्न करणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

मलायका अनेक वर्षांनंतर गाण्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली असून तिच्यासोबत गुरु रांधवा देखील आहे. 'तेरे की ख्याल' असं गाण्याचं नाव असून गाण्याला सध्या सोशल मीडियासोबतच सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच गाण्याच्या प्रमोशन दरम्यान तिनं लग्नाबाबत खुलासा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

SCROLL FOR NEXT