Maitreya Marathi Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Maitreya Marathi Movie: फ्रेंडशिप डेचं खास गिफ्ट! क्रांती रेडकर घेऊन येत आहेत 'मैत्रेया'ची गोष्ट

Maitreya Marathi Movie: फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने क्रांती रेडकर वानखेडे यांच्या 'मैत्रेया' चित्रपटाची घोषणा करण्यात आली. मैत्री, नाती आणि आयुष्याच्या अनपेक्षित वळणांची भावनिक कथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shruti Vilas Kadam

Maitreya Marathi Movie: ‘मैत्री’ हा शब्द उच्चारताच प्रत्येकाच्या आयुष्यातील काही चेहरे नकळत डोळ्यांसमोर येतात. काही नाती काळासोबत बदलतात, काही हरवतात, तर काही आयुष्यभर मनात घर करून राहातात. अशाच एका मैत्रीच्या प्रवासाची झलक फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने समोर आली आहे.

समर टाईम्स प्रॉडक्शन निर्मित ‘मैत्रेया’ या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा उत्सुकता वाढवणाऱ्या पोस्टरद्वारे करण्यात आली आहे. ‘काकण’ या संवेदनशील चित्रपटानंतर लेखिका-दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे पुन्हा एकदा एका नव्या विषयासह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटाची निर्मिती मनोज खळतकर यांनी केली आहे.

‘मैत्रेया’च्या पोस्टरवरून हा चित्रपट समर, आयुषी, स्काय आणि रुची या कलाकारांनी साकारलेल्या पात्रांच्या आयुष्याभोवती फिरणार असल्याची झलक पाहायला मिळते. पोस्टरमध्ये या चार कलाकारांची नावं समोर आली आहेत. या चौघांच्या नात्याची गोष्ट नेमकी काय असणार, याबाबत मात्र अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. याचा उलगडा लवकरच होणार असून, चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

लेखिका-दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे म्हणतात, “‘मैत्रेया’ ही प्रत्येकाच्या आयुष्यातील त्या मैत्रीची गोष्ट आहे, जी काळ बदलला तरी मनात कायम राहाते. या चित्रपटातून मैत्रीचे अनेक रंग, नात्यांची गुंतागुंत आणि आयुष्याची अनपेक्षित वळणं अनुभवायला मिळतील. ‘काकण’नंतर पुन्हा एक वेगळी कथा प्रेक्षकांसमोर आणताना खूप आनंद होत आहे. ‘मैत्रेया’चा हा प्रवास लवकरच प्रेक्षकांसोबत शेअर करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brass Cleaning : पितळी देव काळे पडलेत? घरातील या २ गोष्टींनी मिळवा पुन्हा चमक; जाणून घ्या स्वच्छतेची सोपी पद्धत

Navratri Necklace Designs : गरबा लूकला चारचाँद लावतील 'हे' ७ नेकलेस डिझाइन्स, घागरा-चोळीसोबत नक्की ट्राय करा

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

SIR Update : SIR प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार; जाणून घ्या A to Z माहिती

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची शिवतीर्थावर नेत्यांची बैठक

SCROLL FOR NEXT