Bigg Boss Marathi will start soon Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : महेश मांजरेकर लवकरच सांगणार 'राग शांत करण्याचे १०१ उपाय'

महेश मांजरेकरांनी बिग बॉस ४ पर्वाचा प्रोमो व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : हिंदीप्रमाणे मराठीमध्येही बिग बॉस(Bigg Boss) हा कार्यक्रम चांगलाच चर्चेचा विषय ठरलेला आहे. मराठीमध्ये बिगबॉसचे आतापर्यंत एकूण ३ सीझन झाले आहेत. आता लवकरच येत्या काही दिवसांमध्ये बिगबॉसचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच, बिग बॉसचे होस्टिंग महेश मांजरेकर करणार या वृत्ताला चांगलेच तुफान आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रमाची सुत्रसंचालनाची जबाबदारी महेश मांजरेकर यांच्याच खांद्यावर आहे. महेश मांजरेकरांनी(Mahesh Manjrekar) बिग बॉस ४ पर्वाचा प्रोमो व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

महेश मांजरेकरांनी शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, 'मी करणार आहे बिगबॉस मराठीची सगळ्यात मोठी घोषणा', असे म्हणत हा प्रोमो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. या प्रोमो व्हिडीओमध्ये महेश मांजरेकरांचे तीन लूक दिसत आहेत. पहिल्या लूकमध्ये त्यांनी जॅकेट आणि सदरा परिधान केला आहे तर दुसऱ्या लूकमध्ये तोंडात शिट्टी आणि सोबतच एक डॅशिंग लूक दिसत आहे. तर तिसऱ्या लूकमध्ये मांजरेकर पोस्टमनच्या वेशात दिसत आहेत. या प्रोमोनंतर चाहत्यांपासून ते कलाकारांनपर्यंत बिगबॉसच्या चौथ्या सीझनबद्दल कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

महेश मांजरेकर आता कोणती आगामी घोषणा करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. बिग बॉस मराठीचा चौथा सीझन पुढे ढकलल्याची बातमी गेल्या काही दिवसांमध्ये समोर येत होती. त्यामुळे आता निर्माते कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. माहितीनुसार महेश मांजरेकर लवकरच बिग बॉस मराठीची रिलीज डेट जाहीर करणार असेही म्हटले जात आहे.

बिग बॉस मराठीचा चौथा सीझन कोण होस्ट करणार यावर वेगवेगळे अंदाज बांधले जात होते. बिग बॉस मराठीचे तिन्ही पर्व महेश मांजरेकरांनी होस्ट केले आहेत. गेल्यावर्षी कर्करोगामुळे महेश मांजरेकरांना काही भागांमधून ब्रेक घ्यावा लागला होता. त्यामुळे चौथा सीझन कोण होस्ट करणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. पण कलर्स मराठीने प्रोमो शेअर करत महेश मांजरेकर होस्ट करणार असल्याचे जाहीर केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP आंदोलनावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय; विद्यार्थ्यांवरील सर्व FIR रद्द, 2,873 जणांविरुद्ध नव्याने गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी सरकारचे शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल

PM मोदींनी घेतली पाकिस्तानच्या पंतप्रधानांची सर्वांसमोर शाळा; दहशतवादाच्या मुद्द्यावर दिला कडक मेसेज

Bedsheet Clean : घरातल्या मळलेल्या पांढऱ्या चादरी कशा स्वच्छ कराव्यात? ही एक ट्रिक ठरेल सगळ्यात भारी

Bathroom Vastu Tips: घरातील बाथरूमविषयी 5 महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहिती असायला हव्यात!

SCROLL FOR NEXT