Maharashtrachi Hasyajtra Fame Priyadarshani Indalkar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Farzi: शाहिदसोबत हास्यजत्रेतील लोकप्रिय अभिनेत्री झळकणार, वनितानंतर 'या' अभिनेत्रीला लागली लॉटरी

कृष्णा डीके दिग्दर्शित 'फर्जी' या वेब सीरिजमध्ये शाहिद कपूरसोबत एका मराठी अभिनेत्रीची जोरात चर्चा सुरु आहे.

Chetan Bodke

Maharashtrachi Hasyajtra Fame Priyadarshani Indalkar: कृष्णा डीके दिग्दर्शित 'फर्जी' या वेबसीरीजची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. ही वेब सीरिज १० फेब्रुवारी पासून ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाली आहे. या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिकेत शाहिद कपूर आणि विजय सेतुपती दिसत आहे. या वेब सीरिजमध्ये शाहिद कपूर सोबत एका मराठी अभिनेत्रीची जोरात चर्चा सुरु आहे.

वेब सीरिजमध्ये शाहिद कपूर एक चोर आहे तर, तामिळ सुपरस्टार विजय सेतुपती एका पोलिसाच्या भूमिकेत आहे. शाहिद कपूरने ‘फर्जी’ वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केल आहे. ही एक हिंदी क्राइम थ्रिलर वेब सीरीज असून त्याचे दिग्दर्शन कृष्णा डीके आणि राज निदिमोरू यांनी केले आहे.

या वेब सीरिजमध्ये प्रमूख भूमिकेत शाहिद कपूर आणि विजय सेतुपती सोबतच राशी खन्ना, रेजिना कॅसांड्रा, के के मेनन, कुब्ब्रा सैत आणि इतर अनेकजण सहाय्यक भूमिकेत आहेत. पण सहाय्यक भूमिकेत एका मराठी अभिनेत्रीने सर्वांचच लक्ष वेधलंय. ती म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकर.

प्रियदर्शिनीने ‘फर्जी’ वेब सीरिजमध्ये शाहिद कपूरच्या कंपनीच्या रिसेप्शनिस्टची भूमिका केली आहे. ती सीरिजच्या दोन भागांमध्ये पाहायला मिळते. जेव्हा शाहिद कपूर त्याच्या कंपनीसाठी रिसेप्शनिस्टच्या मुलाखती घेतो. त्या मुलाखतीला येणाऱ्यांपैकी प्रियदर्शिनी एक असते. नंतर तिची निवड होते, असे तिचे सीन आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism : सुट्टीमध्ये करा पुणेकरांच्या आवडत्या वीकेंड डेस्टिनेशनची सफर, 'हे' ठिकाण पावसाळ्यात मन मोहून टाकते

Brain Tumor Symptom: हे 1 सायलेंट लक्षण दिसलं तर समजा मेंदूमध्य तयार होतोय ट्यूमर

Maharashtra News Live Update: पुण्यात कॉक्रोज जनता पार्टीचं आंदोलन

Tuesday Horoscope : रोमॅंटिक दिवस जाईल, ५ राशींचे भाग्य उजळणार, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

आंध्र प्रदेशातील स्टील प्रकल्पात मोठा स्फोट; ८ मजुरांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT