Gaurav More Dance Video Saam TV
मनोरंजन बातम्या

Gaurav More Post: फिल्टर पाड्याच्या बच्चनची शिर्डीत हवा; सुजय विखे, सुदेश भोसलेंसोबत धरला ठेका

Viral Video: गौरवने फॅन मोमेन्ट शेअर केली आहे.

Pooja Dange

Gaurav More Dance Video: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम विनोदवीर गौरव मोरे याची वेगळी ओळख सांगायची आता गरज राहिलेली नाही. पण जेव्हा गौरव मंचावर येतो तेव्हा तो स्वतःची ओळख फिल्टर पाड्याचा बच्चन अशी करून देतो. गौरवला फिल्टर पाड्याचा बच्चन असेही म्हणतात. गौरव बिग बी यांचा मोठा फॅन आहे. तसेच नुकतीच त्याने एक फॅन मोमेन्ट शेअर केली आहे.

गौरवाने त्याचे सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये गौरव अमिताभ बच्चन यांच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्याने शेअर केलेला हा व्हिडिओ शिर्डी महोत्सवातील आहे. या व्हिडिओमध्ये गायक सुधेश भोसले देखील दिसत आहेत.

गौरवने उभा व्हिडिओला कॅप्शन देत म्हटले आहे की, 'शिर्डी महोत्सव २०२३…, ज्यांना बघुन आपण मोठे झालो. आपल जेवढं वय आहे तेवढा अनुभव असलेले सुधेश सर त्यांच्यासोबत मंच शेयर करायला मिळण हे मी माझं भाग्यच समजतो. आय लव्ह यु सर आणि धन्यवाद, कालची रात्र मी कधीही विसरणार नाही.'

या व्हिडिओमध्ये गौरव आणि सुधेश भोसले गाताना आणि नाचताना दिसत आहेत. गौरव आणि सुधेश भोसले अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित डॉन चित्रपटातील 'मैं हू डॉन' या गाण्यावर धम्माल करत आहेत. व्हिडिओमधील तर प्रेक्षक या जुगलबंदीला जबरदस्त प्रतिसाद देत आहेत. सर्वत्र एकाच जल्लोष पाहायला मिळत आहे.

याचसह गौरव मोरे आणि खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या डान्स व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. महापशुधन एक़स्पो २०२३ शिर्डी येथे दोघेही 'मैं हू लखन' गाण्यावर डान्स करत आहेत. तर सुधेश हे गाणे लाईव्ह गात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar Attack : जामखेडच्या कला केंद्रात राडा, नर्तकीच्या तक्रारीनंतर २० जणांचा धिंगाणा, तोडफोड

मनसे-शिवसेना युतीचं ठरलं! जागावाटपासाठी ठाकरेंचे ३ शिलेदार सज्ज, घोषणा कधी करणार?

Ratnagiri Tourism : बच्चे कंपनीसोबत दिवाळीत करा किल्ल्यावर भटकंती, रत्नागिरीतील 'हे' ऐतिहासिक ठिकाण पाहाच

Maharashtra Live News Update : - पहिल्या वर्षापासून हिंदी सक्तीला नागपूरातील तज्ज्ञांचा विरोध

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, ३० तासांचा जम्बो ब्लॉक, अनेक ट्रेन रद्द अन् लोकलवरही परिणाम

SCROLL FOR NEXT