Maharashtrachi Hasyajatra Latest Episode Saam TV
मनोरंजन बातम्या

Maharashtrachi Hasyajatra: अश्विनीने खांद्यावर डोकं ठेवताच गौरव लाजला; स्किटमध्ये दोघांचा कल्ला

Gaurav More Post: अश्विनीने गौरवसोबत एक स्किट सादर केले आहे.

Pooja Dange

Gaurav More-Ashwini Kasar Crazy Performance: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही एक सुप्रसिद्ध विनोदी मालिका आहे. या मलिकने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. या मालिकेतील काही स्किट पुनःपुन्हा सादर व्हावी असे प्रेक्षकांना वाटत असते. त्यात गौरवचं लग्न हा प्रेक्षकांच्या आवडता विषय आहे. कालच्या भागात गौरवाची बायको दाखवली आहे. तिने या भागात काय ट्विस्ट आणला हे पाहूया.

अभिनेत्री अश्विनी कासार सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात दिसत आहे. अश्विनीने गौरवसोबत एक स्किट सादर केले आहे. या स्किटमध्ये अश्विनी गौरवाची बायको झाली आहे. तर दोघेही डेटला जंगलात गेलेले आहेत. तर जंगल त्यांना डाकू पडतात आणि त्यानंतर स्किटमध्ये खरी गंमत सुरु होते. (Latest Entertainment News)

अश्विनी या स्किटमध्ये एक सुसंकृत मुलगी दाखविण्यात आलाय आहे. ती गौरवचे आणि त्याच्या स्वभावाचे कौतुक करते. तिच्या वागण्या-बोलण्याने गौरव भारावून जातो आणि अश्विनीचे कौतुक करतो. तसेच त्याच्या आधीच्या सर्व सहकलकरांना गँग्स ऑफ वासेपूरमधील गुंड म्हणतो.

अश्विनी आणि गौरव जंगलात असताना डाकू येतात आणि गौरवकडे पैसे मागतात. तर गौरवच्या खिश्यातुन फक्त ३० रुपये मिळतात. अश्विनी डाकू काय करतील हे सांगते आणि डाकू तसं तिला करायला सांगतात. अश्विनीला तिचे घराचे नाचू देत नाहीत म्हणून ती या डाकूंसमोर मनसोक्त नाचते. त्याबदल्यात तिला पसे मिळतात. तर तिसऱ्या डान्सनंतर त्यांचे पैसे संपतात.

तेव्हा तिथे डाकूंमधील एकाला कल्पना सुचते आणि ते अश्विनीला त्यांच्याकडे ठेवून घेतात. अश्विनी देखील डान्ससाठी गौरवला सोडून देते. त्यामुळे या भागात देखील गौरवला बायको मिळत नाही. अश्विनीने या भागाचा फोटो पोस्ट करत तिचा हा एपिसोड कसा वाटायला हे विचारले आहे. गौरवने देखील तिची स्टोरी त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

तसेच अश्विनी हास्यजत्रेच्या कलाकारांसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. अश्विनीने ती यासाठी खूप उत्साहीत असल्याचे तिने सांगितले आहे. तासवच संपूर्ण टीम आणि सचिन मोटे यांचे आभार मानले आहेत. 'गौरव तू कमाल आहेस' असे म्हणत तिने त्याचे विशेष आभार मानले आहेत.तिच्या या पोस्टवर अनेक मराठी सेलिब्रिटी कमेंट करत आहेत.

अश्विनी कासारची सध्या नवीन मालिका प्रेक्षकांनाच्या भेटला आली आहे. या मालिकेचे नाव कारण गुन्ह्याला माफी नाही असे आहे. या मालिकेत अश्विनी अनुजा हवालदार ही भूमिका साकारत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father shot: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर झाडल्या गोळ्या; २ तरुणांनी केला हत्येचा प्रयत्न

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

SCROLL FOR NEXT