Arun Kadam Daughter Gave Good News Instagram
मनोरंजन बातम्या

Arun Kadam Daughter News: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम यांच्या घरी तान्हुल्याचे आगमन, लेकीने दिली गोड बातमी...

Arun Kadam Daughter Gave Good News: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम यांच्या लेकीने गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Arun Kadam Become Grand Father: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम यांच्या जीवनामध्ये एका गोष्टीमुळे आनंद द्विगुणीत झाला आहे. कायमच प्रेक्षकांना लोटपोट हसवणारे अरुण कदम यांची मुलगी सुकन्या हिने चाहत्यांना गेल्या काही दिवसांपूर्वी गोड बातमी दिली होती. नुकतंच तिने बाळाला जन्म दिला असून अरुण कदम यांनी चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी सुकन्या आणि तिच्या पतीने अगदी मराठमोळ्या पद्धतीतील कपडे परिधान करत बेबी बंप फोटोशूट केलं होतं. आपल्या लेकीच्या डोहाळे जेवनाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ अरुण कदम यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली होते. मध्यंतरी सुकन्या, तिचे पती आणि अरूण कदम यांनी खास पारंपारिक लूक करत मुंबईच्या मरिन ड्राईव्ह परिसरात खास फोटोशूट केलं होतं. त्यांचं हे फोटोशूट सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल झाले होते.

अरुण कदम यांची मुलगी सुकन्याने २०२१मध्ये सागर पोवाळेसोबत लग्नगाठ बांधली होती. सुकन्या पेशाने कमर्शिअल आर्टिस्ट आणि ग्राफिक डिझायनर असून ती भरतनाट्यम देखील शिकली आहे. अनेकदा सुकन्याने तिच्या वडिलांसोबत धम्माल मस्ती करतानाचे रील्स शेअर केले होते.

अरुण कदम यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दित अनेक कॉमेडी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली असून त्यांचे अनेक पात्र कायमच प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Damage Causes: जर तुम्हाला या 5 चुकीच्या सवयी असतील तर समजा तुमचं हृदय होतंय कमकुवत

Maharashtra News Live Update: पुणे राष्ट्रवादीत उमेदवारावरून गोंधळ

MLC Election : हायव्होल्टेज ड्रामा! अर्ज भरायला तास राहिला, पण उमेदवार ठरेना, 'हे' आहे मुख्य कारण; काँग्रेसचा 'प्लॅन बी' नेमका काय?

लग्नानंतर बायकोला राणीसारखं ठेवतात 'या' 4 राशींचे पुरुष! कधीच करत नाहीत भांडणं

Death News : प्रसिद्ध सोशल मीडिया कंटेंट क्रिएटरचा मृत्यू, अवघ्या 23 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT