Maharashtrachi Hasya Jatra Saam Tv
मनोरंजन बातम्या

Maharashtrachi Hasya Jatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आता अमेरिकेत हसवणार; MHJ Live शोसाठी निघाली टीम

Maharashtrachi Hasya Jatra Team: महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो अमेरिकेत होणार आहे.

Manasvi Choudhary

छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा लोकप्रिय शो आहे. गेली अनेकवर्ष हा शो प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे. या शोचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशात देखील महाराष्ट्राची हास्यजत्राची क्रेझ आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा शोचे लाइव्ह शो भारतासह, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, दुबई या ठिकाणी देखील होतात. परदेशातही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोला प्रेक्षकांची गर्दी असते.

आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा लाइव्ह शो अमेरिकेत होणार आहे. अमेरिकेत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा शो MHJ Live आहे. १९ सप्टेंबर २०२४ ते ६ ऑक्टोबर २०२४ या दरम्यान हा शो होईल. अमेरिकेतील एकूण ११ मोठ्या शहरांमध्ये हा शो पार पडेल.

नुंकतच महाराष्ट्राची हास्यजत्राची संपूर्ण टीम अमेरिकेला रवाना झाली आहे. विमानतळावरचे या टीमचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चेतना भट,प्रभाकर मोरे, समीर चौघुले, इशा डे, दत्तू मोरे, नम्रता संभेराव, रसिका वेंगर्लेकर ही कलाकार मंडळी अमेरिकत जाण्यासाठी निघाली आहे. अमेरिकेत महाराष्ट्राची हास्यजत्रा शोची धमाल, मस्ती याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

अभिनेता प्रसाद खांडेकरने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे. विमानतळावरील हा व्हिडीओ असून त्याने "अमेरिका कॉलिंग 'महाराष्ट्र हास्यजत्रा' लाइव्ह सीझन २" असं कॅप्शन दिलय. इशा डेने हम तो चले अमेरिका अशी स्टोरी पोस्ट केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT