Gaurav More News Post  Instagram/ @im_gaurav_more20
मनोरंजन बातम्या

Gaurav More Share Post: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील सुपरस्टार गौरव मोरेची मोठी झेप; नव्या लूक मागचं कारण रिव्हील

Gaurav More Share Update: समीर चौगुले यांनी गौरव मोरेने त्याचा लूक बदलल्याचे पोस्ट करत सांगितले होते.

Pooja Dange

Gaurav More In Hindi Movie:

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' दोन महिन्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आली. या कार्यक्रमातील कलाकार पराशर दौऱ्यावर गेले असल्याने कार्यक्रम दोन महिने बंद होता. स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्राची हास्यजत्रा पन्हे प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

या दोन महिन्यात कलाकारांनी खूप वेगवगेळ्या गोष्टी केल्या आहेत. कार्यक्रम सुरु झाल्यानंतर कलाकारांच्या पोस्ट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

काही दिवसांपूर्वी समीर चौगुले यांनी गौरव मोरेने त्याचा लूक बदलल्याचे पोस्ट करत सांगितले होते. गौरवाचा नवीन लूक पाहून सगळेच हैराण झाले होते. पण गौरवने हा लूक का केला? त्याने केस का कापले? हे मात्र समजले नव्हते.

परंतु आता या प्रश्नच उत्तर मिळालं आहे. गौरव एका हिंदी चित्रपटामध्ये झळकणार आहे आणि त्याचा नवीन लूक हा त्या चित्रपटातील पात्रासाठी आहे. 'संगी के संग' असे या चित्रपटाचे नाव आहे. (Latest Entertainment News)

गौरव मोरेने चित्रपटाच्या टीमसह फोटो पोस्ट केले आहेत. तसेच 'टीम संगी के संग' असे कॅप्शन देत विद्या मालवडे, संजय बिश्नोई यांना टॅग केले आहे. सुमित कुलकर्णी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

गौरव मोरेच्या पोस्टवर समीर चौघुले यांनी ' गौरी... तू रॉकस्टार आहेस मित्रा... खूप शुभेच्छा' अशी कमेंट केली आहे. त्याचसह गौरव मोरेचे चाहतेत्याचे कौतुक करत आहेत. तसेच कमेंट करून अभिनंदन करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT