Devendra Fadnavis And Amruta Fadnavis Deva Dhi Dev Song Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Devadhi Dev Song: देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांचं नवं गाणं आलं! VIDEO

Devadhi Dev Song Out: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं आणि त्यांची पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी गायलेलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

Chetan Bodke

Shankar Mahadevan Amruta Fadnavis Song

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं आणि त्यांची पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी गायलेलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर ‘देवाधी देव महादेव’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. गेल्या तीन महिन्यांतलं फडणवीसांनी लिहिलेलं हे दुसरं गाणं आहे. सध्या सोशल मीडियावर फडणवीसांच्या गाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. गाण्यावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भगवान शंकरावर ‘देवाधी देव महादेव’ हे शिवगीत लिहिले असून गायक व संगीतकार शंकर महादेवन आणि अमृता फडणवीस यांनी त्या गाण्याला स्वरबद्ध केले आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर हे गाणं रिलीज झाले होते. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘देवाधी देव महादेव’गाण्याची जोरदार चर्चा रंगली होती. या गाण्याचे ‘शिवसंभो, नीलकंठ तू अनादी....देवाधी देव महादेव...’ असे या गाण्याचे बोल आहे. गाण्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत हे गाणं ३८ लाख लोकांनी पाहिले आहे. तर ४१ हजारांहून अधिक युजर्सने गाण्याला लाईक केले आहे.

प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठेवेळेही फडणवीसांनी प्रभू श्रीरामावर एक गाणं लिहिलेलं होतं. त्या गाण्याचे बोल ‘राम नाम’ असे होते. हे गाणं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं होतं. तर, अमृता फडणवीस यांनी हे गाणं गायलं होतं. तर महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक अजय- अतुल यांनी ह्या गाण्याची निर्मिती केली होती. हे गाणं चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले होते. आता प्रभू श्री रामाच्या गाण्यानंतर शिवगीत लोकप्रिय होत आहे. अमृता फडणवीसांच्या गाण्यांची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होते. त्यांनी आजवर अनेक गाणे गायले आहेत. ‘वो तेरे प्यार का गम’, ‘शिव तांडव स्रोतम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’, ‘आज मै मूड बना लिया’ या त्यांच्या गाण्याला लोकप्रियता मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT