Viju Mane Post Instagram
मनोरंजन बातम्या

Viju Mane Post: ‘तब्येत बरी नसतानाही ठेवला विनंतीचा मान’, विजू मानेंनी सांगितला मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ किस्सा...

Viju Mane News: दिग्दर्शक विजु मानेंनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये भेटीदरम्यानचा फोटो शेअर केला आहे.

Chetan Bodke

Viju Mane Post

गणेशोत्सवाची सर्वत्र धूम आहे. अगदी सर्वसामान्यांपासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी आपल्या घरी गणपती बाप्पा बसवला आहे. नुकतंच मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने कायमच चर्चेत असतात. नेहमीच विजू माने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर आपले मतं मांडत असतात.

सामाजिक, राजकीय, मनोरंजन विश्वातील घडामोडींवरील अनेकदा त्यांची पोस्ट चर्चेत असते. विजू माने यांच्या घरीही गणरायाचे आगमन झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिग्दर्शक विजु माने यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेतले. नुकतंच दिग्दर्शक विजु मानेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भेटीदरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे.

दिग्दर्शक विजु माने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले, “राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी गेली जवळपास २० वर्ष (कोरोनातली दोन वर्षे वगळता) आमच्या घरच्या गणपतीच्या दर्शनाला येण्याचा शिरस्ता ह्या वर्षीही मोडला नाही. आभार मानून अपमान करणार नाही परंतु ह्या व्यक्तीच्या या वृत्तीचं कौतुक केलं पाहिजे. ते एक आमदार असताना, मग मंत्री झाल्यावर आणि आता मुख्यमंत्री झाल्यावरचं सलग दुसरं वर्ष ते आमच्या घरी आले. मी, मा. शरद पवार ह्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने सर्वसामान्य माणसाला भेटीगाठी दिल्याचे अनेक किस्से ऐकले आहेत. परंतु सन्माननीय एकनाथजी शिंदे ही मला आलेली प्रचिती आहे.” (Actors)

विजु माने पोस्टच्या माध्यमातून किस्सा सांगताना म्हणाले, “राजकारण आपल्या जागी असेल परंतु माझ्या मते याला समाजकारण म्हणावं. थेट संपर्कातून, संवादातून समाजभान जपण्याचं द्योतक आहे हे. केवळ माझ्या घरी आले, म्हणून मी हे सांगतो आहे असं नाही. माझ्या बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये शिरता शिरता आमच्या बिल्डिंग मधल्या एका व्यक्तीने त्यांना विनंती केली, माझ्या घरी गणपतीला याल का? मला माहिती होतं, साहेबांची तब्येत बरी नाहीये. त्यांना थ्रोट इन्फेक्शन, शिवाय तापही आहे आणि तरीही त्यांनी त्या व्यक्तीची विनंती नाकारली नाही. मलाही त्यांच्या घरी घेऊन गेले आणि त्यांच्याही घरच्या गणपतीचे दर्शन घेतले. ” (Eknath Shinde)

आपल्या पोस्टच्या शेवटच्या भागात विजु माने सांगतात, “कै. धर्मवीर आनंद दिघे यांचा सर्वसामान्यांमध्ये असलेला करिष्मा त्यांच्या दांडग्या जनसंपर्कामध्ये होता. यात सगळ्यात महत्त्वाचं स्थान गणेशोत्सवाला आहे. दिवस-रात्र गणेशोत्सव मंडळ आणि जी कोणी व्यक्ती आमंत्रित करेल त्या व्यक्तीच्या घरच्या श्री गणेशाचे दर्शन हा पायंडा त्यांनी पाडला होता. त्याच पावलांवर पाऊल ठेवत आपली सामान्य जनतेशी असलेली नाळ तुटणार नाही याची काळजी एकनाथ शिंदेसाहेब घेत आहेत हे खचितच भूषणावह आहे.” सध्या दिग्दर्शक विजु माने यांची ही पोस्ट तुफान व्हायरल होत असून नेटकरी त्यांच्या पोस्टवर बऱ्याच प्रमाणात कमेंट करीत आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT