Assembly Election 2024 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Assembly Election 2024: अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा यांनी बजावला मतदानाचा हक्क

Riteish Deshmukh And Genelia Dsouza Vote: अभिनेता रितेश देशमुखने पत्नी जेनेलिया देशमुखसह मतदानाचा हक्क बजावला आहे.

Manasvi Choudhary

Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला नुकतीच सुरूवात झाली आहे. आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदान करण्याला सुरूवात झालीये. सर्वसामान्य मंडळीपासून सेलिब्रिटीदेखील मतदानाचा हक्क बजावत आहेत. नुकतंच अभिनेता रितेश देशमुखने पत्नी जेनेलिया देशमुखसह मतदानाचा हक्क बजावला आहे.

अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांनी लातूर मतदान केंद्रावर पोहोचले. नुकतंच या दोघांनीही विधानसभा निवडणूक २०२४ साठी मतदान केले आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये रितेश आणि जेनेलिया मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात आले आहेत. यावेळी रितेश पाढंऱ्या कुर्त्यात तर जेनेलियानेही पांढरा ड्रेस परिधान केला आहे. हे सेलिब्रिटी कपल फारच सुंदर दिसत आहेत. दोघेही रांगेत उभे राहिले आणि मतदान करण्यापूर्वी आपल्या वेळेची वाट पाहताना दिसले.

दरम्यान मतदान केल्यानंतर, जेनेलियाने मतदान केंद्राबाहेर माध्यमाशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सर्वांनी मतदानाचा आपला हक्क बजवावा असे आवाहन केले आहे. दोन दिवसांपूर्वीच रितेश देशमुख हे बंधू अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते. विधानसभेच्या निवडणूक रिंगणात अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे दोघेही उमेदवार आहेत. अमित देशमुख यांच्या प्रचारसभेसाठी रितेश देशमुख देखील उपस्थित होते. रितेश देशमुख यांनी यावेळी मतदान करण्याचे आवाहन केले होते. रितेश देशमुख यांच्या डायलॉगबाजीने यावेळी लक्ष वेधून घेतले. यांच्या सोशल मीडियावर प्रचार सभेचे त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT