Gaurav More Dance On DDLJ Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gaurav More: फिल्टर पाड्याच्या बच्चनला DDLJ चा फीवर; लंडनमध्ये किंग खानच्या गाण्यावर गौरव मोरेचा अफलातून डान्स

Gaurav More Dance On DDLJ Song : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत असतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Gaurav More Dance On Shahrukh Khan Song :

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत असतो. ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ या नावाने गौरव मोरेची चाहत्यांमध्ये ओळख आहे. कायमच सोशल मीडियावर गौरव मोरे अनेक व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतो. नुकताच गौरव मोरेने सोशल मीडियावर किंग खानच्या गाण्यावरचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

गौरव मोरे कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. परंतु तो आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याच्या या चर्चेचे कारण म्हणजे त्याने पोस्ट केलेला व्हिडिओ. नुकताच गौरव मोरेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात तो शाहरुख खानच्या 'हो गया है तुझको तो प्यार सजना' या गाण्यावर डान्स करत आहे. लंडनमध्ये गौरवने एका ओपन बसमध्ये हा डान्स केला आहे.

शाहरुख खानच्या गाण्यावर गौरव मोरेचा डान्स

गौरव मोरेने या व्हिडिओत DDLJ मधील 'हो गया है तुझको तो प्यार सजना' गाण्यावर डान्स केला आहे. लंडनमध्ये एका ओपन डबल डेकर बसमध्ये हा व्हिडिओ शुट केला आहे. लाल टीशर्ट,जॅकेट आणि जीन्स अशा जबरदस्त लूकमध्ये गौरव मोरे दिसत आहे.

गौरव मोरेने शाहरुख खानसारखा डान्स करण्याचा प्रयत्न केला आहे. खास हावभाव देत त्याने डबल डेकर बसमध्ये धमाल केली आहे. त्याचा हा व्हिडिओ 'बॉईज 4' च्या शुटिंगवेळी काढला असल्याचे समजत आहे.

गौरव मोरे आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांची मने जिंकतो. परंतु आता तो एका नवीन भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बॉईज 4' चित्रपटातून गौरव मोरे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Crime: मेहुण्याच्या प्रेमात झाली वेडी, जगात येण्यापूर्वीच बाळाला संपवलं अन् कचऱ्यात फेकलं

Marathi Vijay Melava: ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी वरळी डोमबाहेर मराठी जनसागर|VIDEO

SCROLL FOR NEXT