Madhuri Dixit buys a new house Saam TV
मनोरंजन बातम्या

Madhuri Dixit: माधुरी दिक्षितचे 'सीफेसिंग' नवे घर; किंमत वाचून व्हाल अवाक

माधुरी दिक्षितने आपल्या चाहत्यांना दसऱ्याच्या शुभमुहुूर्तावर चाहत्यांना नव्या घराची गुड न्युज दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनी (Bollywood) नवीन घर खरेदी करण्याचा कदाचित मानस केला आहे. त्यात शाहिद कपूर, मीरा राजपूत, विवेक अग्निहोत्री (Bollywood Actor) नंतर आता बॉलिवूडची धक धक गर्लनेही (Bollywood Actress) मुंबईत (Mumbai) अलिशान नवे घर खरेदी केले आहे. हे नवे घर मुंबईतील लोअर परेल परिसरात आहे. माधुरी बऱ्याचदा खासगी आयुष्यामुळे किंवा चित्रपटांमुळे खास चर्चेत असते. (Madhuri Dixit)

माधुरीचे हे नवे घर सी फेसिंग असून एका अलिशान बिल्डिंगमध्ये 53 व्या मजल्यावर आहे. हे घर 5,384 चौरस फूट इतके आहे. एका वेबपोर्टलने माहिती दिल्यानुसार, 28 सप्टेंबर 2022 रोजी या घराचं रजिस्ट्रेशन करण्यात आले होते. माधुरीने 2.4 कोटी रुपये देत घराची स्टँम ड्युटी भरली होती. या घरासोबतच माधुरीला पार्किंग स्पेस देखील मिळाले आहे. माधुरीच्या या घराची (Madhuri Dixit New Apartment) किंमत 48 कोटी रुपये आहे. माधुरीने फ्लॅट घेतलेल्या सोसायटीत अनेक सुविधा मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील वरळी भागात माधुरीने भाड्याने घर घेतले होते. वरळीतील High Rise Apartment मध्ये 29 व्या मजल्यावर माधुरीचे घर होते. रिपोर्टनुसार, या घराचे भाडे 12.5 लाख इतके होते. 5500 चौरस फूट असणाऱ्या या आलिशान घराचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फ्लॅट अपूर्वा मेहता यांनी डिझाइन केला असून हे देखील घर सी फेसिंग आहे.सध्या माधुरी झलक दिखला जा या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या समोर येत आहे.

'मजा मा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमात माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत असून येत्या 6 ऑक्टोबरला हा सिनेमा अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Grahan Yog 2025: ग्रहण योग ३ राशींना करणार मालामाल; सूर्य-केतूच्या युतीने जगू शकणार राजासारखं आयुष्य

Ind vs Eng : ब्रूक-रूटची शतकीय खेळी, नंतर भारतीय गोलंदाजांचं कमबॅक; ओव्हल कसोटीचा निकाल शेवटच्या दिवशी लागणार

Amit Thackeray: मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हातपाय तोडा, मग पोलिसांना द्या: अमित ठाकरे

JK Encounter: पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ६ चकमकी, २१ दहशतवाद्यांना कंठस्नान

Prajwal Revanna: प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप; पीडितेच्या साडीवरील स्पर्म मुख्य पुरावा|VIDEO

SCROLL FOR NEXT