Drashti Dhami Saam Tv
मनोरंजन बातम्या

Drashti Dhami: लक्ष्मी आली! प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, वयाच्या ४० व्या वर्षी गोंडस मुलीला दिला जन्म

Drashti Dhami: 'मधुबाला' प्रसिद्ध अभिनेत्री दृष्टी धामी आई झाली आहे. पोस्ट शेअर करत दृष्टीने माहिती दिली आहे.

Manasvi Choudhary

टिव्ही विश्वात मधुबाला म्हणून लोकप्रिय असलेली अभिनेत्री दृष्टी धामी आई झाली आहे. दृष्टीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर दृष्टीने पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. दृष्टीच्या पोस्टवर सोशल मीडियावर सर्वांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

'ती आली आहे, २२ ऑक्टोबर २०२४', असे कॅप्शन देत द्रष्टीने मुलीच्या स्वागताची पोस्ट शेअर केली. यामध्ये 'ती थेट स्वर्गातून आमच्या हृदयापर्यंत आली आहे, एक पूर्णपणे नवीन आयुष्य, एक पूर्णपणे नवी सुरुवात. २२ ऑक्टोबर २०२४. ती आली आहे.' असं म्हटलं आहे.

सोशल मीडियावर दृष्टीच्या पोस्टवर सेलिब्रिटीसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. करण ग्रोव्हर, नकुल मेहता, जानकी मेहता, सुरभी ज्योती, सनाया इराणी, शक्ती अरोरा अशा अनेक कलाकारांनी तिच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. चाहत्यांनीही तिचे अभिनंदन केले. अभिनेत्रीच्या पोस्टवर हार्ट आणि नजर इमोजींचा अक्षरश: पाऊस पडला आहे.

दृष्टीने मनोरंजनविश्वात तिचं स्थान निर्माण केलं आहे. मधुबाला या तिच्या भूमिकेने प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. दिल मिल गए, परदेस मे है मेरा दिल, एक था राजा एक थी रानी या मालिकांमध्ये दृष्टी दिसली. २०१५ मध्ये दृष्टीने बिझनेसमन नीरज खेमकासोबत लग्नगाठ बांधली. आता लग्नाच्या ९ वर्षानंतर या कपलला कन्यारत्न झाली आहे. यामुळे हे दोघेही आनंदी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ऑपरेशन सिंदूर सायबर हल्ला प्रकरणी जुन्नरमध्ये NIAची धाड

8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

SCROLL FOR NEXT