Maatrubhumi Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Maatrubhumi Trailer: सलमान खानच्या ‘मातृभूमी’चा ट्रेलर रिलीज; आर्मी यूनिफॉर्ममध्ये भाईजानचा दमदार अंदाज!

Maatrubhumi Trailer: सलमान खानच्या ‘मातृभूमी’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. देशभक्ती आणि युद्धाची कथा असलेला हा चित्रपट ४ डिसेंबरला रिलीज होणार आहे.

Shruti Vilas Kadam

Maatrubhumi Trailer: बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानच्या आगामी ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचे पोस्टर आणि पहिली झलक समोर आल्यापासूनच चाहत्यांमध्ये या सिनेमाची उत्सुकता होती. आता ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. देशभक्ती, त्याग, युद्ध आणि भावनांनी भरलेली कथा या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

कसा आहे ‘मातृभूमी’चा ट्रेलर?

सुमारे ४ मिनिटे ३५ सेकंदांच्या या ट्रेलरची सुरुवात पूर्व लडाखमधील बर्फाच्छादित आणि धोकादायक पर्वतरांगांच्या सीनने होते. त्यानंतर सलमान खानची दमदार एन्ट्री पाहायला मिळते. चित्रपटात तो '१६ बिहार रेजिमेंट'मधील एका शूर लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. देशाच्या रक्षणासाठी कुटुंबापासून दूर सीमेवर जाण्याचा निर्णय घेतलेल्या सैनिकाची कथा यातून उलगडते. ट्रेलरमधील एक भावूक प्रसंग विशेष लक्ष वेधून घेतो. आपल्या मुलांचा निरोप घेताना सलमान म्हणतो की, सैनिक कधीही 'गुडबाय' म्हणत नाहीत, तर ते 'सॅल्यूट' करतात. या संवादातून सैनिकांचे कर्तव्य, त्याग आणि देशाप्रती असलेली निष्ठा अधोरेखित होते. यानंतर चिनी सैन्याविरुद्धचा संघर्ष आणि युद्धभूमीवरील थरारक दृश्ये पाहायला मिळतात.

सलमान खानचा दमदार अंदाज, चित्रांगदासोबत केमिस्ट्री

या चित्रपटात सलमान खान एका सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, अभिनेत्री चित्रांगदा सिंगदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. ट्रेलरमध्ये दोघांची पडद्यावरील केमिस्ट्री पाहायला मिळते. युद्धाच्या थरारासोबतच सैनिकांच्या कुटुंबातील भावना, त्यांचे संघर्ष आणि युद्धाचा सामान्य माणसांच्या आयुष्यावर होणारा परिणामही चित्रपटात मांडण्यात आला आहे. मुंबईत आयोजित विशेष मीडिया कार्यक्रमात सलमान खानने सुमारे २५० माध्यम प्रतिनिधींच्या उपस्थितीत चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला. यावेळी ७५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी चित्रपटाचे तिकीट केवळ ११ रुपये ठेवण्याची घोषणा केली.

४ डिसेंबरला चित्रपटगृहांत होणार प्रदर्शित

सलमान खानने ट्रेलर लाँचदरम्यान चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली. ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ हा चित्रपट ४ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अपूर्व लाखिया यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, ‘सलमान खान फिल्म्स’च्या बॅनरखाली निर्मिती करण्यात आली आहे. सलमान खान आणि चित्रांगदा सिंग यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातून देशासाठी लढणाऱ्या सैनिकांचे शौर्य, त्याग आणि शांततेचा संदेश प्रेक्षकांसमोर येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI MDR Charges : UPI पेमेंटवर आता एक्स्ट्रा चार्ज? ₹२,००० पेक्षा जास्त व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद; वनविभागाला मोठं यश

Railway Accident : भीषण! धावत्या एक्स्प्रेसचे ५ डबे रुळावरून घसरले; ५० प्रवासी जखमी

NCP Merger: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचे २०-२२ आमदार फुटणार, बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ

वास्तुशास्त्रानुसार घरात झाडू कुठे ठेवावा आणि कुठे ठेवू नये?

SCROLL FOR NEXT