Hanumanji Watching Adipurush Saam TV
मनोरंजन बातम्या

Hanumanji Watching Adipurush : रामाची कथा ऐकायला हनुमानाची हजेरी; आदिपुरुषच्या स्क्रिनिंग दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल

Viral Video Of Adipurush: चित्रपटगृहातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Pooja Dange

Video During Adipurush Screening : बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित आदिपुरुष हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. प्रभास आणि क्रिती सेनन असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून चित्रपटाला तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान चित्रपटगृहातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. (Latest Entertainment News)

आदिपुरुषच चित्रपट सुरू असतानाचा एका प्रेक्षकाने व्हिडिओ काढला आहे. या व्हिडिओ यामध्ये वानर दिसत आहे. हा वानर डोकावून चित्रपट बघत आहे. हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या नेटकाऱ्याने या व्हिडिओ कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'हनुमान जी पाहत आहेत.... अगदी बरोबर!! भगवान हनुमान जगाच्या त्या प्रत्येक ठिकणी दिसतात जिथे श्री रामाची कथा सांगितली जाते !! जय श्री राम'

व्हिडिओमध्ये राम आणि रावणाचे युद्ध सुरू असल्याचे दिसत आहे. तर प्रभासच्या डायलॉगनंतर चित्रपटगृहात शिट्ट्या, टाळ्या आणि जय श्री रामचा आवाज घुमत आहे.

आदिपुरुषच्या टीमने शेअर केलेल्या म्हटले होते की, "जिथे रामायणाचे पठण केले जाते तेथे भगवान हनुमान दिसतात. अशी आमची श्रद्धा आहे. या श्रद्धेचा आदर करून, प्रभासचा राम-स्टार आदिपुरुष प्रदर्शित होणार्‍या प्रत्येक थिएटरमध्ये भगवान हनुमानासाठी एक जागा तिकीट विकत न घेता राखून ठेवण्यात येईल. (Movie)

रामाच्या या महान भक्ताला आदरांजली अर्पण करण्यामागचा इतिहास जाणून घ्या. आम्ही हे महान कार्य अज्ञात मार्गाने सुरू केले आहे. आपण सर्वांनी भगवान हनुमानाच्या सान्निध्यात आदिपुरुषाने केलेल्या हे महान कार्य पहावे."

तर या जागेवर जखरच हनुमान पाहायला मिळाल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahi Poha Recipe : अवघ्या ५ मिनिटांत बनवा सकाळचा नाश्ता, आंबट-गोड 'दही पोहे' एकदा खाल तर खातच राहाल

Maharashtra Live News Update: जायकवाडी धरण ९१ टक्के भरले, आज धरणाचे दरवाजे १८ फुटांनी उघडणार

Nagpur : नागपूर बोगस शिक्षक भरती प्रकरणात मोठी कारवाई, सिद्धेश्वर काळुसे आणि रोहिणी कुंभार यांना अटक

Pink E Rikshaw: खुशखबर! आता एकही रुपया न भरता महिलांना मिळणार पिंक रिक्षा, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

Smartphone Features: तुमच्या स्मार्टफोनमध्ये लपलेली 'ही' गुप्त फीचर्स माहिती आहेत का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT