Kangana Ranaut On Starkids Saam Tv
मनोरंजन बातम्या

कंगनाचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान; पाहा काय म्हणाली?...

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत अनेकदा तिच्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखली जाते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत अनेकदा तिच्या वादग्रस्त (controversial) विधानांसाठी ओळखली जाते. कंगनाला (Kangana Ranaut) एखादी गोष्ट आवडत नसेल, तर ती त्या गोष्टीला उघडपणे विरोध करते. कंगना राणौत रोज स्टार किड्सना आपल्या टार्गेटवर (target) घेत असते आणि पुन्हा एकदा तिने बॉलिवूडच्या (Bollywood) स्टार किड्सबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

कंगना राणौतने साऊथ सिनेसृष्टी (South Cineworld) आणि तिच्या स्टारबद्दल बोलताना हे सांगितले आहे की, साऊथ सिनेसृष्टीतील स्टार्सच्या तुलनेत बॉलीवूडच्या स्टार किड्सशी कनेक्ट होणं प्रेक्षकांना कठीण जात असल्याचंही अभिनेत्रीने (actress) म्हटलं आहे. यादरम्यान कंगना राणौतने तिच्या आगामी 'धाकड' या चित्रपटाबाबत भरभरून चर्चा केली आहे. साऊथ सिनेमा आणि बॉलीवूडबद्दलही तिने यावेळी बोली आहे.

हे देखील पाहा-

कंगना राणौत म्हणाली, 'दक्षिण भारतीय चित्रपटातील स्टार्स ज्या प्रकारे स्वत:ला प्रेक्षकांशी जोडतात, ते खूप मजबूत आहे. तिथले कलाकार रसिकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करतात आणि आपले काय होते. त्यांची मुले (स्टार मुले) त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी परदेशात जातात. इंग्रजीत बोला, फक्त हॉलिवूड चित्रपट बघा. चाकू आणि चमचा याबरोबर अन्न खा. मग सांगा आमचे प्रेक्षक त्यांच्याशी कसे जोडले जाणार?

आपला मुद्दा पुढे करत कंगना म्हणाली, 'हे लोक दिसायलाही विचित्र दिसतात, ते उकडलेल्या अंड्यांसारखे दिसतात. त्याचा संपूर्ण लुकच बदलला आहे, मग लोकांचे नाते कसे असणार आहे. कोणालाही ट्रोल करण्याचा माझा हेतू नाही. यानंतर कंगना राणौतने नुकतेच प्रदर्शित झालेल्या दक्षिण चित्रपट अभिनेता अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाचे कौतुक केले आणि सांगितले की, आजच्या काळात बॉलीवूडमध्ये मजुरांसारखा दिसणारा एकही स्टार नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : नागपुरात पेट्रोल पंपावर दिसला वाघ; परिसरात भीतीचे वातावरण, व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar Plane Crash Mystery: दादांच्या अपघातावरून पुन्हा 'संशयकल्लोळ', अपघातापूर्वी बारामती विमानातळाची रेकी

एकनाथ शिंदे मोठा डाव टाकणार; कोणाच्या गळ्यात घालणार राज्यसभेची माळ? शेवटच्या क्षणापर्यंत संस्पेन्स

T20 WC 2026: टॉपर दक्षिण आफ्रिका पुन्हा 'चोकर्स'; न्यूझीलंडने दिमाखात गाठली फायनल, पाच पराभवांचा घेतला बदला

युद्धाचा भडका, शेतकऱ्यांना फटका; आखाती देशांमध्ये निर्यात महागली, VIDEO

SCROLL FOR NEXT