Marathi Celebrity Voting News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pune Lok Sabha Election : मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क; चाहत्यांनाही दिला मोलाचा सल्ला

Marathi Celebrity Voting News : अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि गायक सलील कुलकर्णी ह्यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमासोबत संवाद साधला.

Chetan Bodke

देशात आज चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. सर्वच मतदार घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. नागरिकांसह अनेक मराठी सेलिब्रिटीही मतदानाचा हक्क बजावत आहेत. आज अभिनेते अमोल कोल्हे, सुबोध भावे, राहुल देशपांडे, मोहन आगाशे, बेला शेंडे, श्रृती मराठे, सोनाली कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी आणि सलील कुलकर्णी यांनी आज पुण्यात मतदानाचा हक्क बजावला आहे.

राज्यात आज ११ मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यात शिरुर, छत्रपती संभाजी नगर, पुणे अशा अनेक ठिकाणी मतदान होणार आहे. यावेळी पुण्यामध्ये, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हिने मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमासोबत संवाद साधला होता. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी म्हणाली, " आपण भारताचे नागरिक आहोत. आपल्या शहराचा आज आपण प्रतिनिधी निवडून देत आहोत. खरंतर हे खूप पवित्र्य काम आहे. आपल्या शहराचा लोकप्रतिनिधी निवडून देण्याची संधी आपल्याला पाच वर्षातून एकदाच मिळते, ही आपण संधी बजवायलाच हवी. मी ही मतदानाचा हक्क बजावलाय तुम्हीही मतदानाचा हक्क बजावा. राजकीय भाष्य करणार नाही. चार तारखेला कळेलच काय होतेय."

त्यासोबतच गायक सलील कुलकर्णी आणि त्यांचा मुलगा शुभंकर कुलकर्णीनेही मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सलील कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया दिली की, "नुसतं कॅफेमध्ये बसून चर्चा नाही करायची, बाहेर पडून लाईनमध्ये थांबून मत द्या आणि मग तुम्हाला चर्चा करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तरुणाईने बाहेर पडून मतदान केलं पाहिजे. ५ वर्ष तुम्ही ट्रीप काढा ना पण तुम्ही देशासाठी, संविधनासाठी एक दिवस तर द्या." असं स्पष्ट मत गायक लेखक सलील कुलकर्णी यांनी मांडलं आहे. आज पुण्यातील पी जो कॉलेज मध्ये सलील कुलकर्णी यांनी त्यांच्या चिरंजीव शुभंकर सह मतदानाचा हक्क बजावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT