Vikram Gokhale Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vikram Gokhale : रंगभूमीवरील 'बॅरिस्टर'; विक्रम गोखलेंचा जीवनप्रवास

जाणून घेऊयात विक्रम गोखले यांचा जीवनप्रवास...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Vikram Gokhale Passes Away : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७७ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आज (शनिवारी) त्यांचे निधन. विक्रम गोखले (Vikram Gokhale)  यांच्यावर गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. विक्रम गोखले यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. जाणून घेऊयात त्यांचा जीवनप्रवास...

विक्रम गोखले यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1945 रोजी झाला. चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तीनही माध्यमांतून त्यांनी काम केले आहे. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आघात हा चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले. सन २०१३ साली प्रदर्शित झालेल्या अनुमती या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनय-संन्यास घेतला आहे.

विक्रम गोखले यांची गाजलेली नाटके

एखादी तरी स्मितरेषा, कथा, कमला, कल्पवृक्ष कन्येसाठी, के दिल अभी भरा नही, खरं सांगायचं तर, छुपे रुस्तम, जावई माझा भला, दुसरा सामना, नकळत सारे घडले, पुत्र मानवाचा, बॅरिस्टर, मकरंद राजाध्यक्ष, महासागर, मी माझ्या मुलांचा, संकेत मीलनाचा, समोरच्या घरात, सरगम, स्वामी या त्यांच्या नाटकांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली.

विक्रम गोखले यांचे मराठी चित्रपट

माहेरची साडी, लपंडाव, वजीर, नटसम्राट, मॅरेथॉन जिंदगी,आघात, आधारस्तंभ, आम्ही बोलतो मराठी, कळत नकळत, ज्योतिबाचा नवस, दरोडेखोर, दुसरी गोष्ट, दे दणादण, भिंगरी, महानंदा, वऱ्हाडी आणि वाजंत्री, वासुदेव बळवंत फडके, सिद्धान्त हे त्यांचे मराठी चित्रपट लोक आजही आवडीनं बघतात. 

विक्रम गोखले यांचे हिंदी चित्रपट

अकेला, अग्निपथ, अधर्म, आंदोलन, इन्साफ, ईश्वर, कैद में है बुलबुल, क्रोध, खुदा गवाह, घर आया मेरा परदेसी, चँपियन, जख़मों का हिसाब,जज़बात, जय बाबा अमरनाथ, तडीपार, तुम बिन, थोडासा रूमानी हो जाय, हम दिल दे चुके सनम, वजीर हे त्यांचे चित्रपट लोक आजही आवडीनं बघतात. 

पुरस्कार

’अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी २०१३सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार

विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्कार (२०१५)

‘बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशन’तर्फे बलराज साहनी पुरस्कार

हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार (४-८-२०१७)

पुलोत्सव सन्मान (डिसेंबर २०१८)

चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT