Gautami Patil News saam tv
मनोरंजन बातम्या

Gautami Patil New Song: ‘माझा कारभार सोप्पा नसतोय रं...’ गौतमी पाटीलनं दिली गुड न्यूज

Gautami Patil New Song: सध्या सोशल मीडियावर गौतमीच्या नव्या गाण्याचा टीझर तुफान व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Gautami Patil New Song Release Coming Soon

सबसे कातील गौतमी पाटील... या कॅप्शनमुळे नेहमीच चर्चेत राहणारी गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली. एका मराठी अभिनेत्रीची सोशल मीडियावर जेवढी चर्चा होत नाही, त्याहून अधिक चर्चा गौतमीची होते.

लावणीमुळे गौतमीला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली आहे. तिची लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत एक वेगळीच क्रेझ आहे. गौतमीला अल्पावधीतच लावणीमुळे एक वेगळीच ओळख मिळाली आहे.

सध्या गौतमी सोशल मीडियावर तिच्या आगामी गाण्यामुळे बरीच चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर गौतमीच्या नव्या गाण्याचा टीझर तुफान व्हायरल होत आहे.

काल गौतमीने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. ती म्हणाली, “नमस्कार मी तुमची सर्वांची लाडकी गौतमी पाटील. आज संध्याकाळी साडेसात वाजता माझं एक नवीन गाणं तुमच्या भेटीला येत आहे. माझ्या नव्या गाण्याचं नाव, ‘माझा कारभार सोप्पा नसतोय रं’. माझं हे नवीन गाणं रेक्स स्टुडियोच्या या यूट्यूब चॅनलवर येत आहे. या गाण्याची निर्मीती रत्नदिप कांबळे यांनी केली आहे. तर सर्वांनी आवर्जून हे गाणं बघावे. त्या गाण्यामध्ये मी तुम्हाला एका खास लूकमध्ये दिसणार आहे. तर सर्व प्रेक्षकवर्ग, महिलावर्ग सर्वांनी हे गाणं आवर्जून बघा आणि तुमचं प्रेम माझ्यावर कायम आहे आणि कायम राहू द्या. आणि तेवढंच जास्त गाण्याला सुद्धा प्रेम द्या. धन्यवाद.” (Actress)

काही तासांपूर्वी गौतमीने नव्या गाण्याचा टीझर शेअर केला असून त्याला, प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. सध्या गौतमीचा या नव्या गाण्याचा टीझर सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. अद्यापा गाण्याची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नसून गाण्याचा टीझर सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. मध्यंतरी गौतमी एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा होत होती. तिच्यावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट

Nagpur University : शिक्षणाच्या आयचा घो! परीक्षेत पैकीच्या पैकी गुण तरीही गुणपत्रिकेत 'नापास'; नागपूरातील ढोबळ कारभार

KBC 17: कौन बनेगा करोडपती सीझन १७चा पहिला करोडपती; ७ कोटींच्या कोणत्या प्रश्नाचे दिले उत्तर?

First Metro: जगातील पहिली मेट्रो कधी आणि कुठे सुरू झाली? जाणून घ्या रंजक इतिहास

जुना वाद जिवावर उठला! ५ जणांनी अल्पवयीन मुलाच्या अंगावर टेम्पो घातला; रस्त्यावर चिरडून मारलं

SCROLL FOR NEXT