Gautami Patil Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gautami Patil: 'गौतमीताई तुम्ही नाचा, पण...', गौतमी पाटीलचा डान्स पाहून नेटकरी संतापले; ट्रोल करत घेतली शाळा

Gautami Patil Dance With Girls Video: राज्यभरामध्ये गौतमी पाटीलचे डान्स शो (Gautami Patil Dance Show) होतात. या शोला फक्त गौतमीच्या नावानेच मोठी गर्दी होते. गौतमी पाटील सध्या लाखों तरुणांच्या दिलाची धडकन झाली आहे.

Priya More

Gautami Patil Dance Video:

'सबसे कातील गौतमी पाटील' म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या डान्स आणि अदांच्या माध्यमातून वेड लावणारी गौतमी पाटील (Gautami Patil) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर गौतमी पाटीलची क्रेझ वाढली आहे. सध्या सगळीकडे एकच चर्चा होते ती म्हणजे गौतमी पाटीलची. राज्यभरामध्ये गौतमी पाटीलचे डान्स शो (Gautami Patil Dance Show) होतात. या शोला फक्त गौतमीच्या नावानेच मोठी गर्दी होते. गौतमी पाटील सध्या लाखों तरुणांच्या दिलाची धडकन झाली आहे.

गौतमी पाटीलच्या डान्सचे सर्वजण दिवाने आहेत. तिच्या प्रत्येक गाण्यावर डान्स करून त्याचे रील्स तयार केले जातात आणि ते व्हायरल देखील होतात. गौतमी पाटीलच्या डान्सच्या प्रेमात फक्त मोठेच नाही तर लहान मुलं देखील पडले आहेत. राज्यातील चिमुकल्या मुली देखील तिच्यासारखं डान्स करतात. गौतमी पाटील ज्या-ज्या ठिकाणी डान्स शोसाठी जाते तिथे तिच्यासोबत डान्स करण्यासाठी अनेक लहान मुली येतात. त्या देखील गौतमीला टक्कर देत डान्स करून दाखवतात. आता अशाच एका कारणामुळे गौतमी पाटील चर्चेत आली असून तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

सध्या सोशल मीडियावर गौतमी पाटीलच्या एका डान्स कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. गौतमी पाटील ऑफिशिअल या इन्स्टा पेजवर देखील हा व्हिडिओ टाकण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, गौतमी पाटील स्टेजवर 'सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम' (Sarkar Tumhi Kelay Market Jam Song) या गाण्यावर डान्स करत आहे. गौतमीसोबत स्टेजवल ३ लहान मुली देखील डान्स करत आहेत. गौतमी जशी डान्स स्टेप करत आहे तशाच हुबेहुब डान्स स्टेप त्या करत आहेत. गौतमी डान्स करून झाल्यानंतर या मुलींना आपल्या गालावर किस करण्यास देखील सांगते.

गौतमी पाटीलच्या या डान्स व्हिडीओवर कमेंट्स करत नेटिझन्सनी तिची चांगलीच शाळा घेतली आहे. त्यांनी तिला खडेबोल सुनावले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, 'तू नाच आणि अजून तुझ्या पुढे 10 तयार कर नाचायला. काय माय जरातर लाजावं की. देशाच भविष्य नाचवताना.' दुसऱ्या नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, 'गौतमीताई तुम्ही नाचा. लहान मुली आहेत हो. विचार करा.' तिसऱ्या नेटकऱ्याने कमेंट्समध्ये लिहिले की, 'लहान मुली आहेत एवढी तरी अक्कल ठेवा.' आणखी एका युजरने लिहिले की, 'अगं... तू नाचली ना बास झालं... बाक्कीच्या मुलींना नको हे धंदे करायला लावू... खरंच.' तर आणखी एका युजरने लिहिले की, 'नको पुढची पिढी वाया घालवू.' अशाप्रकारच्या अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी तिला खडेबोल सुनावले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT