Gautami Patil Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gautami Patil: गौतमी पाटीलचं खरं नाव आहे वेगळंच, स्वत:च सांगितलं; VIDEO व्हायरल

Gautami Patil Video: नुकताच गौतमी पाटीलचा पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमध्ये कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला तिच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. यावेळी गौतमीच्या एका चाहतीने तिची भेट घेतली.

रोहिदास गाडगे

Gautami Patil Real Name:

सबसे कातिल गौतमी पाटील सध्या चांगलीच चर्चेत आहे. लावणी डान्सर गौतमी पाटीलचे (Gaurami Patil) राज्यभरात ठिकठिकाणी डान्सचे कार्यक्रम होतात. गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रम म्हटलं तर चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असते. ज्या गावामध्ये गौतमीचा कार्यक्रम होतो त्या गावाच्या आसपासच्या गावातील नागरिक तिची झलक आणि डान्स पाहण्यासाठी मोठी गर्दी करतात. अशामध्ये नुकताच गौतमी पाटीलचा पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमध्ये कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला तिच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. यावेळी गौतमीच्या एका चाहतीने तिची भेट घेतली. गौतमीने यावेळी सर्वांना तिचे खरं नाव (Gautami Patil Real Name) नेमकं काय आहे हे सांगितलं.

गौतमी पाटीलच्या आडनावावरुन अनेक वेळा वाद झाला आहे. अशात आता गौतमी पाटीलचे खरं नाव देखील वेगळं असल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: गौतमीनेच तिचे खरं नाव वेगळं असल्याचे सांगत खऱ्या नावाची ओळख करून दिली आहे. गौतमीने तिचे जन्मनाव हे वैष्णवी असल्याचे सांगितले आहे. आडनावानंतर आता गौतमी पाटीलचे खरं नाव देखील वेगळं असल्याचे समोर आले आहे.

घडलं असं की, जुन्नर तालुक्यातील केवाडी येथे आदिवासी नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गौतमी पाटीलने हजेरी लावली. या कार्यक्रमावेळी गौतमीसारखी दिसणारी एक मुलगी गौतमी पाटीलला प्रत्यक्षात भेटण्यासाठी तिची वाट पाहत होती. या कार्यक्रमाच्या शेवटी तिची आणि गौतमी पाटीलची भेट झाली.

यावेळी एका व्यक्तीने या मुलीची ओळख गौतमी पाटीलला करून दिली. ही मुलगी गौतमीसारखी दिसत असल्यामुळे तिला शाळेमध्ये सर्वजण गौतमी म्हणून चिडवतात. यावेळी गौतमी पाटीलला ही मुलगी तिचे नाव सांगते. ही मुलगी लाजत तिचे नाव वैष्णवी असल्याचे सांगितले. त्यावेळी तिचे नाव ऐकून गौतमी पाटील सांगते की, 'माझं पण जन्मनाव सुद्धा वैष्णवी आहे.' असे सांगत गौतमी पाटील यावेळी तिचं खरं नाव नेमकं काय आहे हे चाहत्यांना सांगते. सध्या गौतमी पाटीलचा हा व्हिडीओ सोशल मीडिायावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT