Gautami Patil  Instagram
मनोरंजन बातम्या

Gautami Patil: माझ्याशी लग्न करशील का?, पैठणी साडीत गौतमी पाटीलचं सौंदर्य पाहून चाहता भाळला

Gautami Patil Paithani Look: गौतमी पाटील पुन्हा चर्चेत आली आहे. त्यामागचे कारण म्हणजे गौतमी पाटीलचा पैठणीसाडीतील लूकचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल (Gautami Patil Video) होत आहे. पैठणी साडीमध्ये गौतमीला पाहून तिचे चाहते प्रेमात पडले आहेत.

Priya More

Gautami Patil Video:

प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. आपल्या नृत्याच्या तालावर गौतमी सध्या संपूर्ण महाराष्ट्राला नाचवत आहे. गौतमी आपल्या डान्स आणि अदांमुळे चांगलीच चर्चेत असते. गौतमी पाटीलचा महाराष्ट्रभर चाहतावर्ग इतका वाढला आहे की तिला पाहण्यासाठी तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण मोठी गर्दी करतात.

गौतमीची डिमांड इतकी वाढली आहे की अगदी लग्न असो, बारसं असो, वाढदिवसाचे कार्यक्रम असो किंवा बैलगाडा शर्यत असो गौतमीला आवर्जुन बोलावले जाते. सध्या गौतमी पाटील पुन्हा चर्चेत आली आहे. त्यामागचे कारण म्हणजे गौतमी पाटीलचा पैठणीसाडीतील लूकचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल (Gautami Patil Video) होत आहे. पैठणी साडीमध्ये गौतमीला पाहून तिचे चाहते प्रेमात पडले आहेत.

गौतमी पाटीलने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोपटी रंगाच्या पैठणी साडीतील व्हिडीओ आणि फोटो पोस्ट केले आहेत. या पैठणी साडीमध्ये गौतमी पाटील खूपच सुंदर दिसत आहे. गौतमी एका कार्यक्रमासाठी ही पैठणी साडी नेसून गेली होती.

नाकामध्ये भलीमोठी नथ, मोकळे केस आणि त्यात कपाळावर लावलेली हिरव्या रंगाची टिकली असा गौतमीने लूक केला होता. या पैठणी साडीमध्ये गौतमीने वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोझ देत फोटोशूट केले आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गौतमीच्या हसण्याने आणि वेगवेगळ्या अदांनी चाहत्यांना अक्षरश: घायाळ करून टाकले आहे.

गौतमीने इन्स्टावर पैठणी साडी नेसलेला व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. 'बघाताच तुला मी चढते मला जी कुठली नशा...' या गाण्यावर गौतमीचा हा व्हिडीओ आहे. गौतमी पाटील कारमधून प्रवास करत असताना हा व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओमधील गौतमी पाटीलचा पैठणी लूक पाहून चाहत्यांना वेड लावलं आहे. या व्हिडीओतील गौतमीच्या सौंदर्याची चाहत्यांना भूरळ पडली आहे.

या व्हिडीओवर कमेंट्स करत चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. गौतमीच्या पोस्टवर कमेंट्स करत तिच्या एका चाहत्याने अजबच मागणी केली आहे. या चाहत्याने गौतमीला थेट लग्नाचीच मागणी घातली आहे. 'माझ्याशी लग्न करशील का गौतमी' अशी कमेंट्स या चाहत्याने केली आहे. यासोबतच गौतमीच्या आणखी एका चाहत्याने 'आय लव्ह यू मॅम', असी कमेंट केली आहे. गौतमीच्या चाहत्यांच्या या कमेंट्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

दरम्यान, 'सबसे कातील गौतमी पाटील' म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या डान्स आणि अदाकाराच्या माध्यमातून वेड लावणारी गौतमी पाटीलचे राज्यभरामध्ये डान्सचे शो होतात. या शोला फक्त गौतमीच्या नावानेच मोठी गर्दी होते. गौतमी पाटील फक्त डान्सचे कार्यक्रम करत नाही तर तिची अनेक गाणी देखील युट्युबवर आतापर्यंत प्रदर्शित झाली आहेत.

गौतमीच्या 'पाटलाचा बैलगाडा', 'सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम', 'दिलाचं पाखरू' आणि 'घोटाळा' ही गाणी खूपच सुपरहिट ठरली. या गाण्यानंतर आता गौतमीचं आणखी एक 'चीझ लई कडक' हे गाणं रिलीज झालं. या गाण्याला देखील प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT