Gautami Patil Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gautami Patil New Song: सबसे कातील गौतमी पाटीलच्या 'घोटाळा'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, तुम्ही पाहिलंत का?

Gautami Patil Dance Video: 'दिलाचं पाखरू'नंतर गौतमी पाटीलचं आणखी एक गाणं रिलीज झाले आहे. गौतमीचे 'घोटाळा' हे गाणं सध्या रिलीज झालं असून ते सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Priya More

Ghotala Song Out:

'सबसे कातील गौतमी पाटील' म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी पाटील सध्या चांगलीच चर्चेत आले. गौतमी पाटील आपल्या अदा आणि नृत्याच्या तालावर संपूर्ण महाराष्ट्राला नाचायला लावते. गौतमीची एक झलक पाहण्यासाठी राज्यभरातील तरुण तिच्या डान्स शोला मोठी गर्दी करताना दिसतात. गौतमी पाटील फक्त डान्सचे कार्यक्रम करत नाही तर तिचे अनेक गाणी देखील युट्युबवर आतापर्यंत प्रदर्शित झाले आहे. अशामध्ये आता 'दिलाचं पाखरू'नंतर गौतमी पाटीलचं आणखी एक गाणं रिलीज झाले आहे. गौतमीचे 'घोटाळा' हे गाणं सध्या रिलीज झालं असून ते सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

गौतमी पाटीलचे 'घोटाळा' हे नवं गाणं नुकताच रिलीज झाले आहे. 'Being Filmy Creations' या यूट्यूब चॅनेलवर तिचे हे नवं कोरं गाणं शेअर करण्यात आले आहे. गौतमी पाटीलच्या या गाण्यातील लूक आणि कातील अदांनी तर सर्वांना वेड लावलं आहे. तिच्या या गाण्याला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. या यूट्युब चॅनेलने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर देखील हे गाणं शेअर केले आहे. गौतमीच्या या गाण्याला युट्यूबवर ८८ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ५ हजारांपेक्षा अधिक जणांनी हे गाणं लाइक केले आहे.

गौतमी पाटीलचे घोटाळा हे गाणं वैष्णवी आदोडेनं गायले आहे. संकेत मेस्त्री या गाण्याचे गीतकार आहे. तर अतुल भालचंद्र जोशी आणि सिद्धेश कुलकर्णी यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. गौतमी पाटीलचे हे गाणं म्हणजे तिच्या चाहत्यांसाठी मेजवाणीची उत्तम पर्वणीच ठरले आहे. गौतमी पाटीलच्या या गाण्यातील लूकला चांगली पसंती मिळत आहे. तिने या गाण्यात काळ्या रंगाची साडी नेसली आहे. त्यावर तिने ट्रेडिशनल गोल्डन ज्वेलरी घातली आहे. न्यूड मेकअप आणि केस मोकळे सोडत तिने आपला लूक परिपूर्ण केला आहे. या गाण्यामध्ये गौतमी नेहमीप्रमाणेच खूपच सुंदर दिसत आहे.

गौतमीचे हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. तिच्या इतर गाण्यांप्रमाणे या गाण्यावर देखील नेटकऱ्यांनी रील्स तयार करण्यास सुरूवात केली आहे. गौतमी पाटीलच्या या आधी रिलीज झालेल्या 'माझा कारभार सोपा नसतोय रं', 'दिलाचं पाखरू', 'सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम', 'पाटलांचा बैलगाडा' या गाण्यांना प्रेक्षकांनी खूपच चांगली पसंती दिली होती. आजही तिचे हे गाणं लग्न, हळद समारंभांमध्ये वाजताना दिसतात. ऐवढंच नाही तर गौतमी देखील तिच्या प्रत्येक शोमध्ये या गाण्यावर अफलातू डान्स करते. दरम्यान, गौतमी पाटील 'घुंगरू' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. १५ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: मृत व्यक्तीच्या फोटोसमोर अगरबत्ती लावावी की नाही?

Maharashtra Live News Update: परभणीत भर पावसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

Video : तेरे जैसा यार... दंडाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून गाणं गाणे भोवलं! तहसीलदाराचे निलंबन

GST : छत्र्या, मोबाइल, कपडे ते सायकल, सिमेंट होणार स्वस्त, वाचा केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन

मेट्रोच्या एका कोचची किंमत किती असते?

SCROLL FOR NEXT