Meena Deshmukh Saam Tv
मनोरंजन बातम्या

ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघाती निधन

पंढरपूरमध्ये झालेल्या एका भीषण अपघातात महाराष्ट्रातील ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे निधन झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या मराठी चित्रपटसृष्टी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या जाण्याने सावरत नाही तोच एका ज्येष्ठ कलावंतीनीला महाराष्ट्राने गमावले आहे. पंढरपूरमध्ये झालेल्या एका भीषण अपघातात महाराष्ट्रातील ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे निधन झाले आहे. देशमुख यांची चार चाकी गाडी एका कालव्यात कोसळली असून त्यातच त्यांचे निधन झाले आहे. या अपघातात मीना देशमुख यांचे निधन झाले असून त्यांच्या गाडीतील तिघं जण गंभीर जखमी झाले आहेत.

मोडनिमकडून पंढरपूरकडे प्रवास करत असताना रविवारी रात्री मीना देशमुख यांची फॉरच्युन कार खोल कालव्यात कोसळली. त्यांच्या सोबत त्यावेळी गाडीत देशमुख यांची मुलगी, नात आणि गाडी ड्रायव्हर होते. त्या अपघातात तिघेही गंभीर जखमी असल्याचे कळत आहे.

रोज शेकडो प्रवाश्यांना रस्त्यामुळे, खड्ड्यांमुळे किंवा रस्त्याच्या कामामुळे आपला निष्पाप जीव द्यावा लागत आहे. आतापर्यंत बऱ्याच दिग्गज मंडळींचे रस्त्यामुळे आणि खड्ड्यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. मीना देशमुख यांचा देखील पंढरपूर कुर्डूवाडी रस्त्यावरील अर्धवट कामाने निष्पाप जीव घेतला आहे. रोज अनेक शेकडो प्रवाश्यांना आपला जीव मुठीत ठेवून या पुलावरील प्रवास करावा लागत आहे.

पंढरपूर ते कुर्डूवाडी रस्त्यावरील रोपळे गावाजवळ उजनी कालव्यावरील छोट्या पुलावरून रविवारी रात्री एक फॉर्च्युनर गाडीचा नियंत्रण सुटल्याने थेट पन्नास फूट खाली कालव्यात पडली. या अपघातात मोडनिंममधील लावणी कलावंत मीना देशमुख (वय 60) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर कालव्यात उतरण्यास रस्ताच नसल्याने बराच वेळ मीना देशमुख आणि त्यांच्या परिवाराला मदत मिळाली नसल्याने त्यांना आपला निष्पाप जीव गमवावा लागला.

पंढरपूरमधील रस्त्याचे काम गेल्या बऱ्याच महिन्यांपासून रखडले आहे, अद्याप ही त्या रस्त्याचे काम शासनाकडून मार्गी लागले नाही. अरुंद पुलामुळे या परिसरात अनेकदा अपघात होऊन अनेकांचा नाहक बळी गेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार आणखी किती बळींच्या संख्येची वाट पाहणार आहेत असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: IIT पवईच्या बाहेर वंचितचा आंदोलन

राज्यातील जिल्ह्यांची संख्या वाढणार? सरकारकडून हालचालींना वेग; 7 तालुक्यांसाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा हादरा, बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

T20 Ranking: टी २० रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा जलवा! टॉप ५ मध्ये २ तडाखेबंद फलंदाज

Skin Care: ग्लोइंग आणि मॉइश्चराइज स्किनसाठी घरच्या घरी बनवा 'ही' नाईट क्रीम; ५ दिवसांत दिसेल फरक

SCROLL FOR NEXT