Hridaynath Mangeshkar  Saam Tv
मनोरंजन बातम्या

हृदयनाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल!

भारतरत्न लता मंगेशकर यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : भारतरत्न आणि ज्येष्ठ गायिका दिवंगत लता मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयनाथ (Hridaynath Mangeshkar) यांना रुग्णालयात (hospital) दाखल केल्याची माहिती त्यांचा मुलगा आदित्यनाथ मंगेशकर यांनी दिली. आता हृदयनाथ यांची प्रकृती स्थिर आहे, असे देखील त्यांनी सांगितले आहे. पुढील ८ ते १० दिवसांमध्ये हृदयनाथ मंगेशकर यांना डिस्चार्ज मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे देखील पाहा-

लता दिनानाथ मंगेशकर (Lata Mangeshkar) पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन आदित्यनाथ मंगेशकर यांनी केले होते. या सोहळ्यात सर्व उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, सोहळ्याचे उद्घाटन हृदयनाथ मंगेशकर यांना करायचे होते. पण रुग्णालयात असल्यामुळे त्यांना पाहुण्यांचे स्वागत करता आले नाही. देवाच्या कृपेने ते येत्या ८-१० दिवसांत घरी परततील. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यात सुधारणाही होत आहे, असेही आदित्यनाथ यांनी सांगितले. पंडित हृदयनाथ मंगेशकर हे ८४ वर्षांचे आहेत.

लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला लता मंगेशकर पुरस्कार (lata mangeshkar award) प्रदान करण्यात आला आहे.

मंगेशकर कुटुंबीयांच्या हस्ते मोदींना हा पुरस्कार देण्यात आला. मोदींनी हा पुरस्कार देशवासियांना समर्पित केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Seviyan Kheer Recipe: सणासुदीला घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटरपट बनवा स्वादिष्ट शेवयाची खीर, वाचा सोपी रेसिपी

संतापजनक! बाथरूमच्या फलकावर लावला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो

Maharashtra Live News Update: पुण्यात पाण्याच्या शोधात असणारा बिबट्या विहरीत पडला

वीर सावरकर बदनामी प्रकरणात मोठी अपडेट; सात्यकी सावरकरांकडून अचानक तो अर्ज दाखल, कोर्टात नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav: जेलमधून बाहेर आल्यानंतर राजपाल यादव पुन्हा कामाला लागला; हसवणाऱ्या कलाकराने रडत रडत सगळा घटनाक्रम सांगितला

SCROLL FOR NEXT