Randeep Hudda Saam Tv
मनोरंजन बातम्या

डोळ्यांत राग अन् विखुरलेले केस.. रणदीप हु्ड्डाचा खतरनाक लूक, नेमका काय आहे Laal Rang 2

बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असलेल्या रणदीपने आज एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये तो त्याची एक जुनी भूमिका पुन्हा पडद्यावर साकारणार आहे.

Chetan Bodke

Laal Rang 2: आपल्या अभिनयाच्या जोरावर ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत रणदीप हुड्डाचे नाव अग्रस्थानी आहे. रणदीप नेहमीच सर्व भूमिका आपलीशी करत साकारण्याचा तो प्रयत्न करतो. रणदीप हुड्डा पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असलेल्या रणदीपने आज एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये तो त्याची एक जुनी भूमिका पुन्हा पडद्यावर साकारणार आहे.

रणदीपने आज त्याच्या सोशल मीडिया हँडलवरुन आपल्या नवीन चित्रपटाचे पोस्टर शेअर करून याची घोषणा केली आहे. 2016 मध्ये प्रदर्शित झालेला 'लाल रंग' या चित्रपटाचा सिक्वेल 'लाल रंग 2' आहे.

सय्यद अहमद अफजल दिग्दर्शित, रणदीप हुड्डा पुन्हा एकदा शंकराच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. रणदीप हुड्डा यांनी 'लाल रंग 2'चे पोस्टर शेअर करून याची घोषणा केली आहे, त्यासोबत एक कॅप्शनही लिहिले जे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पोस्ट शेअर करत त्याने लिहिले, 'हा घ्या!हवेत अभिवादन.'

या पोस्टरमध्ये रणदीप हुड्डाभोवती रक्ताचे ठिपके दिसत आहेत. त्याच्या डोळ्यात चाहत्यांना एक भिती दिसून येत आहे. पोस्ट सोबतच रणदीपने 'लाल रंग 2'च्या शूटिंगबाबत एक मोठे अपडेटही दिले आहे. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असून चाहत्यांना चित्रपटाची थोडी वाट पहावी लागणार आहे.

या चित्रपटात अभिनयासोबतच रणदीप निर्मितीही करणार आहे. रणदीपच्या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहेत. दुसरीकडे, चित्रपटाच्या कथेबद्दल बोलताना, 'लाल रंग'मध्ये हरियाणातील रक्तपेढीतून रक्त चोरीची कथा दाखवण्यात आली आहे. आता याच्या दुसऱ्या भागात निर्माते काय नवीन करू शकतात हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT