Krushna Abhishek On Govinda Instagram
मनोरंजन बातम्या

Krushna Abhishek On Govinda: ‘माझा मामा खरंच नंबर वन...’ कृष्णा अभिषेकने मामा गोविंदाचं केलं तोंडभरून कौतुक..

The Kapil Sharma Show Viral Video: ‘द कपिल शर्मा शो’चा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात कृष्णाने मामा गोविंदाचे नाव घेत तोंडभरून कौतुक केलंय..

Chetan Bodke

Krushna Abhishek And Kapil Sharma News: ‘द कपिल शर्मा शो’मधील प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेकने काही दिवसांपूर्वी ‘द कपिल शर्मा शो’ मधून काढता पाय घेतला होता. प्रेक्षकांकडून त्याच्या कॉमेडीचे नेहमीच कौतुक होत होते. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर त्याने पुन्हा एकदा शो मध्ये दमदार एन्ट्री केली. ‘सपना’ या मुलीच्या भूमिकेतून कृष्णाने आपल्या कॉमेडीने सर्वांना हसवले.

नुकताच ‘द कपिल शर्मा शो’चा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यावेळी कृष्णाने मामा गोविंदाचे नाव घेत तोंडभरून कौतुक केलंय.. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत, कृष्णाने त्याच्या मामावर कमेंट केली होती, ज्यामुळे गोविंदा त्याच्या भाच्याववर चिडला होता.

‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर गेल्या आठवड्यात काही आरजेंनी हजेरी लावली होती. कृष्णा अभिषेकने एका शेखची भूमिका साकारत सर्वांचीच खिल्ली उडवली. आरजेंसोबत बोलत असताना त्याने त्याचा मामा गोविंदावर सकारात्मक टिप्पणी केली. तो म्हणतो, तुमच्या प्रमाणेच माझा मामा देखील नंबर वन आहे. हे ऐकून सर्व आरजेंसोबत प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाटात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

व्हायरल व्हिडीओत कृष्णा म्हणतो, दुबईचा नंबर वन शेख कोण? अनेकांची नावे सांगितल्यानंतर त्याने आमचे एक काका आहेत. यावर कपिल बोलतो, इतके सर्व शेख दुबईचे नंबर वन कसे काय असू शकतात? तर यावर कृष्णा म्हणतो, हे सर्व आरजे नंबर वन असू शकतात. याच वाक्याच्या पुढे कृष्णा म्हणतो, पण कपिल मी कधीच खोटं बोलत नाही. मला त्या इतर लोकांची काहीही परवा नाही. पण जो माझा मामा आहे, तो खरंच नंबर वन आहे. माझ्या मामासाठी टाळ्या व्हायला हव्यात. (Video Viral)

माहितीसाठी सांगतो, गोविंदा काही दिवसांपूर्वा या शोमध्ये आला होता. गोविंदा जेव्हा कपिलच्या शोमध्ये सहभागी झाला त्यावेळी कृष्णानेही त्याच्यासमोर परफॉर्म केला होता. त्यावेळी गोविंदाला कृष्णाचा विनोद आवडला नव्हता. आणि गोविंदाने स्टेजवरच कृष्णाला कानाखाली मारलं होतं. त्यानंतर पुढच्या वेळी गोविंदा कपिलच्या शोमध्ये दिसला तेव्हा कृष्णाने आपल्या मामासमोर परफॉर्म करण्यास नकार दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी

Muhurut Trading 2025 : शुभ मुहूर्तावर सेन्सेक्स-निफ्टीची सौम्य तेजी; कोणते शेअर्स चमकले?

Mumbai Crime News : मीरारोडमध्ये मोठा राडा! मुलीच्या छेडछाडीवरून दोन गटात हाणामारी; २० रिक्षांची तोडफोड

Kapoor Family: फॅम जॅम...! बॉलिवूडच्या कपूर खानादानाचा रॉयल दिवाळी फेस्ट लूक

Relationship Tips: सणासुदीला नवरा-बायकोमध्ये भांडणं का होतात? जाणून घ्या कारणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT