KRK Tweet On VIrat Kohli Went Viral Saam Tv
मनोरंजन बातम्या

Virat Kohli Debut In Film Industry: KRK च्या गाजलेल्या देशद्रोही चा पुढचा भाग लवकरच.. क्रिकेटपटू विराट कोहलीला KRK ने दिली अभिनयाची ऑफर

Chetan Bodke

KRK Tweet On VIrat Kohli Went Viral: अनेक खेळाडूंच्या आयुष्यावरील आपण बायोपिक पाहिले आहेत. त्यांचे बायोपिक देखील बरेच हिट झाले आहेत. आता शिखर धवननंतर विराट कोहली देखील चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. विराट कोहली आता क्रिकेट नंतर रुपेरी पडद्यावर अभिनयासाठी सज्ज होत आहे. केआरके अर्थात कमाल रशीद खान याने विराट कोहली अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याची माहिती ट्विट करत दिली. सध्या केआरकेचं ट्विट चांगलंच व्हायरल होत असून त्यावर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे.

नुकतंच केआरकेनं एक ट्वीट केलंय, त्यात त्याने विराट कोहलीच्या नावाचा उल्लेख केला आहे. कोहलीला ‘देश द्रोही’ चित्रपटाच्या सीक्वलमध्ये कास्ट करण्याबाबत केआरकेनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. केआरके ट्वीट करत म्हणतो, “मी विराट कोहलीच्या डान्स स्किल्सने मी खूपच प्रभावित झालो. त्यामुळे मी विराटला माझ्या ‘देश द्रोही २’ या आगामी चित्रपटासाठी आयटम नंबर करण्याची ऑफर देतोय .”

केआरकेचं सध्या हे ट्विट प्रचंड चर्चेत असून विराटचे चाहते चांगलेच भडकले. विराट अनेकदा आपल्याला मैदानात प्रॅक्टिसच्या दरम्यान विचित्र किंवा भन्नाट डान्स करताना दिसतो. त्याचा डान्स पाहून युजर्सचं मनोरंजन होतं, असं केआरकेचं मत आहे. विराटच्या चाहत्यांना भडकवण्यासाठी हे ट्विट केले असल्याचे अनेक नेटकऱ्यांचे मत आहे. (Bollywood News)

विराट कोहली सध्या आयपीएल २०२३ मध्ये व्यग्र आहे. आरसीबीकडून खेळत असलेल्या विराटने तीन सामन्यांमध्ये दोन अर्धशतकाचा समावेश केला. यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबीचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्सविरोधात होणार आहे. आरसीबीने आतापर्यंत ३ सामन्यांपैकी २ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avneet Kaur: गोरे गोरे मुखडे पे काला काला चश्मा... अवनीतचा हटके अंदाज

Maharashtra News Live Updates : जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने थकवा

PM Modi : वर्ध्यातून मोदींनी मविआवर डागलं टीकास्त्र

Buldhana News : दारूबंदी, अवैध धंद्याच्या विरोधात महिलांचा एल्गार; पोलीस स्टेशनला संतप्त महिलांची धडक

Bigg Boss Marathi च्या घरातील सर्वाधिक गाजलेली जोडी कोणती?

SCROLL FOR NEXT