kriti sanon  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Koffee with Karan: कियाराच्या आधी क्रिती सेननला 'लस्ट स्टोरीज'ची ऑफर, 'या' व्यक्तीच्या भीतीने नाकारला रोल

'लस्ट स्टोरीज' मधील एका स्टोरीत कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेसाठी सुरूवातीला क्रिती सेननला विचारण्यात आले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता करण जोहरचा(Karan Johar) 'कॉफी विथ करण' या शो तुफान चर्चेत आहे. या शोमध्ये हल्लीच टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन या कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी 'कॉफी विथ करण'चा होस्ट करण जोहरने आपल्या खास शैलीत या कलाकारांना अनेक प्रश्न विचारले. या शोमध्ये टायगर आणि क्रितीच्या पर्सनल टू प्रोफेशनल आयुष्यातील अनेक खुलासे करण्यात आले. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला 'लस्ट स्टोरीज'मधील एका स्टोरीत कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत दिसली होती. कियाराची ही भूमिका खूप प्रसिद्ध झाली होती. परंतु, या भूमिकेसाठी सुरूवातीला क्रिती सेननला(Kriti Sanon) विचारण्यात आले होते. ही गोष्ट खुद्द क्रितीनेच या शोमध्ये सांगितली आहे.

२०१४ मध्ये, क्रितीने टायगर श्रॉफच्या 'हिरोपंती' या सिनेमामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती 'राबता', 'बरेली की बर्फी', 'लुका छुपी', 'हाऊसफुल ४', 'पानिपत' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली होती. या चित्रपटांमधील तिच्या उत्तम अभिनयामुळे २०१८ साली तिला 'लस्ट स्टोरीज' ऑफर करण्यात आले होते. ज्यामध्ये ४ वेगवेगळ्या कथा होत्या आणि प्रत्येक कथेचा दिग्दर्शकही वेगळा होता. 'लस्ट स्टोरीज'मध्ये क्रितीला कियाराची भूमिका ऑफर करण्यात आली होती. पण या भूमिकेबद्दल ऐकल्यावर ती थोडी घाबरली आणि नंतर तिने या भूमिकेला नकार दिला.

कॉफी विथ करण या शोमध्ये क्रितीने या गोष्टीचा खुलासा केला, "कोणताही इंटीमेट सीन करण्याआधी क्रिती तिच्या आईसोबत बोलते. अशा परिस्थितीत जेव्हा तिला लस्ट स्टोरीज ऑफर करण्यात आली तेव्हा क्रितीला माहित होते की क्रितीची आई कदाचित त्यासाठी सहमत होणार नाही, म्हणून क्रितीने न विचारता ऑफर नाकारली आणि मग ही भूमिका कियारा अडवाणीला ऑफर करण्यात आली. आजही कियाराच्या सर्वोत्तम कामगिरीमध्ये त्याची गणना होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT