Kriti Sanon - Prabhas Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kriti-Prabhas Get Engaged: क्रिती-प्रभास लवकरच उरकणार साखरपुडा?, प्रभासच्या टीमने सांगितलं...

सिद्धार्थ-कियारानंतर लगेच प्रभास आणि क्रिती सेनन साखरपुडा करणार आहेत.

Saam Tv

Kriti-Prabhas Engagement: प्रभास आणि क्रिती सेनन लवकरच 'आदिपुरुष' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. क्रिती आणि प्रभास त्यांच्या चित्रपटांसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असतात. काही दिवसांपासून या दोघांच्या अफेअरच्या बातम्या बॉलिवूड जगतातून येत आहेत. मात्र, दोघांनीही आम्ही एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी अशी बातमी अली होती की, सिद्धार्थ-कियारानंतर लगेच प्रभास आणि क्रिती सेनन साखरपुडा करणार आहेत. दोघे मालदीवमध्ये एंगेजमेंट करणार असल्याचेही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले होते. क्रिती सेननसोबतच्या साखरपुडाच्या वृत्तावर आता बाहुबली अभिनेत्याच्या टीमने प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिले आहे.

क्रिती सेननसोबतच्या एंगेजमेंटच्या बातम्यांना प्रभासच्या टीमने पूर्णविराम दिला आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या टीमने दोन्ही स्टार्सच्या एंगेजमेंटच्या बातम्यांचे खंडन केले आहे. त्यांनी लिहिले की, 'प्रभास आणि क्रिती एकमेकांचे चांगले मित्र आहेत. यापैकी कोणत्याही बातम्यांमध्ये तथ्य नाही.

जेव्हा आदिपुरुष चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला तेव्हा त्यांच्या डेटिंगच्या बातम्यांनी सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच क्रिती सेनननेही त्यांच्यावतीने एक पोस्ट टाकून स्पष्ट केले होते की, दोघांमध्ये मैत्री पलिकडे कोणतेही नाते नाही.

एका चित्रपट समीक्षकाने दोघांच्या एंगेजमेंटबद्दल ट्विट केले होते आणि लिहिले होते की दोघेही लवकरच मालदीवमध्ये एंगेजमेंट करणार आहेत. त्यांची ही बातमी काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाली. प्रभास आणि क्रिती सेनन यांच्या आगामी 'आदिपुरुष' चित्रपटाविषयी बोलायचे तर हा चित्रपट यावर्षी 16 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर निर्मात्यांना टीकेला सामोरे जावे लागले. त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचे ग्राफिक्स पुन्हा एकदा दुरुस्त करून ट्रेलर प्रेक्षकांसमोर आणण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटात प्रभास आणि क्रिती सेनन व्यतिरिक्त सैफ अली खान देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT