Ankita Walavalkar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ankita Walavalkar: कोकण हार्टेड गर्लचं अनोख प्री-वेडिंग शूट, नवऱ्यासोबत फोटो शेअर करत चाहत्यांना विचारला प्रश्न

Ankita Walavalkar Pre Wedding Shoot : कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. नवऱ्यासोबत फोटो शेअर करून तिने चाहत्यांना एक प्रश्न केला आहे.

Shreya Maskar

'कोकण हार्टेड गर्ल' सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. लवकरच अंकिता वालावलकर (Ankita Walavalkar) लग्नबंधनात अडकणार आहे. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये अंकिताने आपल्या गेमने चाहत्यांचे लक्ष वेधलं. बिग बॉसमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. तिला बिग बॉसमुळे 'महाराष्ट्र हार्टेड गर्ल' अशी ओळख मिळाली. अंकिताने बिग बॉसच्या घरात अनेक चांगली नाती जोडली आहेत.

अंकिता वालावलकरला सोशल मीडियामुळे खूप प्रसिद्धी मिळाली. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या आयुष्याचे अपडेट आणि कामाची माहिती ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देते. नुकतीच अंकिताने आपल्या इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्याने चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे. तिने इंस्टाग्रामवर कुणालसोबतचा फोटो शेअर करून चाहत्यांना एक खास प्रश्न केला आहे. तिने कुणालसोबतच्या फोटोला "प्री-वेडिंग शूट करणं गरजेचं आहे का?" असे कॅप्शन देऊन चाहत्यांना असा प्रश्न केला आहे. अंकिताने शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. एका युजरने लिहिलं की, "प्री-वेडिंग शूट हे शास्त्र आहे." अशा धमाल कमेंट्स अंकिताच्या पोस्टवर पाहायला मिळत आहेत.

आजकाल अनेकजण 'प्री-वेडिंग शूट' करतात. अंकिताचा स्पष्टवक्तेपणा प्रेक्षकांना खूप भावला. चाहते तिच्या लग्नासाठी खूप आतुर आहेत. अंकिता मराठी संगीत दिग्दर्शक कुणाल भगतसोबत (Kunal Bhagat) लग्नबंधनात अडकणार आहे.ही दोघ फेब्रुवारी महिन्यात लग्न करणार आहे. मात्र अद्याप अंकिताने कोणतीही लग्नाची तारीख सांगितली नाही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT