Ankita Walawalkar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ankita Walawalkar: बिग बॉस संपल्यावर अंकिता पहिल्यांदाच पोहचली कोकणात; आईला मिठी मारत म्हणाली,आता बिग बॉस नको...

Ankita Walawalkar: बिग बॉस संपल्यानंतर पहिल्यांदाच 'कोकण हार्टेड गर्ल' तिच्या घरी पोहोचली आहे. सोशल मीडियावर अंकिताने याबाबतची माहिती दिली आहे.

Manasvi Choudhary

'कोकण हार्टेड गर्ल' या नावाने प्रसिद्ध असलेली अंकिता वालावलकर कायमच लक्ष वेधून घेत असते. अंकिताच्या तिच्या पर्सनल लाईफसह प्रोफेशनल लाईफमुळे सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर अंकिता तिच्याविषयीच्या अपडेट चाहत्यांना देत असते. बिग बॉस संपल्यानंतर पहिल्यांदाच 'कोकण हार्टेड गर्ल' तिच्या घरी पोहोचली आहे. सोशल मीडियावर अंकिताने याबाबतची माहिती दिली आहे.

अंकिताने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केली आहे. बिग बॉस ७० दिवसांचा शो संपल्यानंतर सर्व स्पर्धक घरी गेले होते. मात्र अंकिता गेली नव्हती. मुंबईतील सर्व कामे करून अंकिता आता तिच्या गावी कोकणात पोहोचली आहे. अंकिताने नुकताच व्हिडीओ शेअर केलाय. अंकिताचा होणारा नवरा कुणाल भगतसोबत अंकिता तिच्या गावी गेली आहे. अंकिताने प्रवासादरम्यान खास गरमागरम वडापावचा आस्वाद घेतला आहे.

पुढे अंकिता तिच्या स्वत:च्या शॉपमध्ये गेली आहे. दरम्यान अंकिताने शॉप छान असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. अंकिता घरी गेल्यानंतर आई- वडिलांना भेटली. मुलीला खूप दिवसांनी भेटल्यानंतर आई बाबा देखील आनंदी दिसत आहेत. अंकिता बिग बॉसच्या घरात बाबांना आणि बहि‍णींना भेटली होती. परंतू आईला भेटली नव्हती यामुळे आईला भेटून तिने घट्ट मिठी मारली आहे. अंकिताचं औक्षण करत तिचे स्वागत करण्यात आलं. सोशल मीडियावर अंकिताने शेअर केलेला 'कोकण वापसी' हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप; ठाकरेंच्या आमदाराच्या निवडणूक प्रचारात CM फडणवीसांचा फोटो|VIDEO

'माझे लग्न लावून द्या' अविवाहित तरूणाचं भाजप आमदाराला पत्र; ४३ व्या वर्षीही पठ्ठ्या सिंगल

Maharashtra Live News Update : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉजला लागली आग

Budget Tour: काय सांगता? इथे 1 रुपयाची किंमत तब्बल 300 रुपये... खिशात फक्त 1000 रुपये ठेवा अन् परदेश फिरा

मातोश्रीवर ड्रोन उडवल्याने खळबळ; अविनाश जाधवांचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT