Koffee With Karan 8 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Koffee With Karan 8: 'मी कोणाची...', करण जोहरच्या त्या प्रश्नावर संतापली करीना कपूर

Priya More

Kareena Kapoor And Alia Bhatt:

'कॉफी विथ करण' या सर्वात वादग्रस्त चॅट शोचा सीझन 8 (Koffee With Karan 8)सध्या चर्चेचा भाग ठरत आहे. 'कॉफी विथ करण 8'च्या चौथ्या एपिसोडमध्ये बॉलिवूडची (Bollywood) 'बेबो' अर्थात अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि आलिया भट् (Alia Bhatt) ट यांनी हजेरी लावली. या शोच्या माध्यमातून या दोघी आपले करिअर, पर्सनल लाईफबद्दल अनेक खुलासे करताना दिसणार आहे.

या चॅट शोच्या नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये, करण जोहर हा अमीषा पटेल आणि करीना कपूर यांच्यातील भांडणावर बोलताना दिसत आहे. ज्यानंतर आलिया भट्ट आपल्या मजेशीर स्टाईलमध्ये करणच्या काऊचला 'कंट्रोवर्शियल विद अ के' असे म्हणते. त्यानंतर करण जोहर असा काय बोलतो की ते ऐकून करीना कपूरच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलतात.

कॉफी विथ करण 8 च्या नव्या एपिसोडच्या प्रोमोमध्ये करण जोहरने त्याच्या स्टाईलमध्ये करीना आणि आलियाला विचारले की, कोण जाऊबाई आहे आणि नणंद कोण आहे. ज्यावर करीना म्हणते, तुला कळलं पाहिजे की तू K3G बनवला आहेस. प्रोमो व्हिडीओमध्ये करण जोहर आलियाशी बोलताना म्हणतो, 'तू तिला वहिनी म्हणते...' हे ऐकून करीना कपूरने मिश्किलपणे प्रतिक्रिया दिली आणि म्हणते, 'मी कोणाची वहिनी नाही. .'

कॉफी विथ करण सीझन 8 च्या नवीन प्रोमोमध्ये, करण जोहरने करीना कपूर आणि अमिषा पटेल यांच्यातील भांडणाचे संकेत दिले आहेत. प्रोमोमध्ये, करण करीनाला 'गदर 2' ची सक्सेस पार्टीला का नाही गेली असं विचारतो. ज्यावर करीना आधी तोंड फिरवते आणि नंतर म्हणते - 'मी करणकडे दुर्लक्ष करत आहे,हे तुम्ही पाहू शकता.' दरम्यान, गदर 2 च्या रिलीजपूर्वी अमिषा पटेलने एक मुलाखत दिली होती. यामध्ये अमिषाने सांगितले होते की 'मी स्वत: 'कहो ना प्या है' सोडला नव्हता. खरं तर, राकेशजी म्हणाले होते की काही मतभेदांनंतर त्यांनी स्वतः करीनाला चित्रपट सोडण्यास सांगितले होते.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

MIM महाविकास आघाडीत सहभागी होणार? कोणत्या भागातून मागितल्या जागा? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, एसआयटी रद्द करा; काँग्रेस आमदारांची सरकारकडे मागणी

Healthy Relationship साठी या सोप्या ट्रिक्स करा फॉलो...

SCROLL FOR NEXT