Fees Of Actors Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Saam TV
मनोरंजन बातम्या

'Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan'साठी अभिनेते व्यंकटेशने घेतले फक्त ५० लाख; बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे शहनाज-राघव 'इतके' पैसे घेऊन झाले मालामाल

Stars In Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाची स्टारकास्ट खूप दमदारआहे.

Pooja Dange

Fees Of Actors Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: सलमान खान सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'किसी का भाई किसी की जान'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांना ट्रेलर खूप आवडला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सलमान खानचा अॅक्शन आणि रोमँटिक अवतार पाहायला मिळत आहे.

'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामध्ये एक प्रेमकथा पाहायला मिळणार असून, यामध्ये सलमान खान आणि पूजा हेगडे यांची कथा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची स्टारकास्ट खूप दमदारआहे. या स्टार्सनी 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटासाठी किती मानधन घेतलं आहे चला जाणून घेऊया.

फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटाचा हिरो सलमान खान आहे. या चित्रपटासाठी सलमानने 50 कोटी रुपये घेतले आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत खुलासा झालेला नाही.

'किसी का भाई किसी की जान' चित्रपटात अभिनेता सलमान खानची मैत्रीण आणि प्रेयसी पूजा हेगडे देखील मुख्य भूमिकेत साकारत आहे. पूजा हेगडेला इतर सर्व अभिनेत्रींनपेक्षा जास्त फी मिळाल्याचे बोलले जात आहे. बातमीनुसार, पूजा हेगडेने या चित्रपटासाठी पाच कोटी रुपये फी घेतली आहे.

हा चित्रपट साऊथ चित्रपट वीरमचा हिंदी रिमेक असल्याचे बोलले जात आहे. हा चित्रपट १०० कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे तर सलमान खानने या चित्रपटासाठी 50 कोटी रुपये घेतले आहेत. दाक्षिणात्य अभिनेता व्यंकटेशने किसी का भाई किसी की जानसाठी 50 लाख रुपये घेतले आहेत.

किसी का भाई किसी की जान हा शहनाज गिलचा पहिला हिंदी चित्रपट आहे. मात्र, याआधी ती पंजाबी चित्रपटांमध्ये दिसली आहे. या चित्रपटासाठी शहनाज गिलला 50 लाख रुपये मानधन मिळाले आहे, तर राघव जुयालने 70 लाख रुपये घेतल्याची माहिती आहे.

या चित्रपटात राम चरण कॅमिओ करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राम चरणने एका झलकसाठी 3 कोटी रुपये घेतले आहेत. राम चरणचा हा हिंदी चित्रपटातील डेब्यू आहे.

'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट ईदला प्रदर्शित होणार आहे. म्हणजे २२ एप्रिल प्रेक्षकांना हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पाहता येणार आहे. या चित्रपटातील गाणी तर हिट झाली आहेत. तसेच चित्रपटाच्या ट्रेलरला अवघ्या २२ तासात १६ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT