Kiran Mane Reject Maharashtra Shaheer Film Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kiran Mane Reject Maharashtra Shaheer Film: किरण मानेंनी ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाला ‘या’ कारणामुळे दिला नकार; पोस्ट चर्चेत...

किरण मानेला ‘बिग बॉस मराठी ४’ नंतर अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. त्यातील काही चित्रपटांना नकार देखील दिला. अशातच त्यांनी ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाला का नकार दिला याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.

Chetan Bodke

Kiran Mane Reject Maharashtra Shaheer Film: ‘बिग बॉस मराठी ४’ च्या नंतर सातारचा सलमान म्हणून सर्वत्र चर्चेत आलेला किरण माने नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. किरण मानेने गेल्या काही दिवसांपुर्वी त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल माहिती देत पोस्ट शेअर केली होती. नुकतंच त्याने ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाबद्दल पोस्ट शेअर केली आहे. मराठी सिनेसृष्टीत अनेक वर्ष चित्रपट, नाटक आणि मालिकेत काम करत स्वत:चा चाहता वर्ग तयार केला आहे.

दरम्यान किरण मानेची पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत असून त्याने कोणत्या कारणामुळे ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाला नकार दिला आहे, त्याबद्दल त्याने पोस्टमध्ये लिहिले. किरण माने म्हणतो, ‘एखादं प्रोजेक्ट तारखांच्या कारणासाठी हातातून गेल्याची चुटपूट लागून रहाते. बिगबॉस नंतर माझ्याकडे खूप कामे चालून आली याचा आनंद आहेच... आजही, आत्ता ही पोस्ट लिहुन लगेच मी कॅमेर्‍यापुढेच उभा रहाणार आहे... हे साध्य झालं फक्त त्या शो मुळेच ! पण... याआधी बिगबॉसच्या आणि शुटिंगच्या तारखा क्लॅश झाल्यानं एक छान सिनेमा सोडावा लागला होता.’ (Marathi Film)

‘‘मुलगी झाली हो’ चं शुटिंग करत होतो. अचानक केदार शिंदेचा फोन आला, "किरण, शाहीर साबळेंवर बायोपिक करतोय. त्यातल्या शाहिरांच्या सातारा वास्तव्यातल्या संवादांमध्ये अस्सल सातारी लहेजा, शब्द, बोली हे सगळं यावं यासाठी मला मदत करशील का? तयार असशील तर प्रतिमाताई, तू आणि मी दादरला जिप्सीमध्ये भेटूया. तुला स्क्रिनप्ले देतो." मी एका क्षणात होकार दिला. फोन ठेवला आणि मन धावत भूतकाळात गेलं... मायणीत...’ (Marathi Actors)

‘...चौथी-पाचवीत होतो. वडिलांनी टेपरेकॉर्डर आणला. सोबत पाचसहा कॅसेटस् होत्या. त्यातल्या काही होत्या शाहीर साबळेंच्या ! 'बापाचा बाप', 'आबुरावाचं लगीन' अशी लोकनाट्यं त्यात होती. ती ऐकून याड लागलं. अक्षरश: तोंडपाठ केली ती. चारपाच मित्र जमवले.. त्यांनाही हा नाद लावला. मग काय, दर रविवारी आमच्या घरापुढच्या व्हरांड्याचं स्टेज बनवायचं आणि शाहिरांची लोकनाट्य सादर करायची ! आयुष्यातलं पहिलं 'स्टेज' , पहिल्या नाटकातला पहिला अभिनय, पहिला प्रेक्षक, अभिनयाचं पहिलंवहिलं कौतुक...हे सगळं सगळं अनुभवायला शाहीरांची ती लोकनाट्यं कारणीभूत ठरली.’ (Latest Marathi News)

‘अकरावीला कॉलेजसाठी सातार्‍यात आल्यावर जेव्हा-जेव्हा शाहीरांचा कार्यक्रम सातारला असेल तेव्हा कार्यक्रमाच्या आधीच ते जिथं मुक्कामाला असत तिथं पोहोचायचो. तिथं जाऊन त्यांच्या पायावर डोकं ठेवून आशिर्वाद घ्यायचो. लै भारी वाटायचं. मी आजही अभिमानानं सांगतो की, आयुष्यातला पहिला ऑटोग्राफ मी शाहीर साबळेंचा घेतलाय !’

‘...'महाराष्ट्र शाहीर'च्या प्रोसेसमध्ये केदारनं काही काळ का होईना सहभागी करून घेणं, हे माझ्यासाठी किती आनंद देणारं असेल, किती मोलाचं असेल हे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल. खरंतर केदार मला या सिनेमात एक छान भुमिकाही देणार होता, पण शुटिंगच्या तारखा आणि बिग बॉस एकाच वेळी आल्यामुळे ती संधी हुकली. पण या निमित्तानं मी ज्यांना गुरूस्थानी मानतो अशा शाहीर साबळेंना सलाम करण्याची छोटीशी का होईना संधी मिळाली. सलाम शाहीर, त्रिवार सलाम !!!’

सध्या ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर होत असून चित्रपटाच्या गाण्यांना, टीझरला आणि ट्रेलरला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. महाराष्ट्राच्या मातीतील थोर लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट येत्या २८ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today : सलग दुसऱ्या सोन्याने घतली उसळी, प्रति तोळा इतक्या रुपयांवर दर पोहोचला; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर

Maharashtra News Live Update:गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

Weight Loss Tips: वजन झटपट कमी करायचंय? फक्त 'या' 3 सवयी लावा; महिनाभरात कपडे होतील सैल

Nail Cancer: नेल एक्स्टेन्शन करत असाल तर सावधान! नखाखाली दिसणारी ही छोटी काळी रेघ ठरू शकते जीवघेण्या कॅन्सरची पहिली घंटा

Soaked almonds benefits: रात्रभर दूधात भिजवून ठेवलेले बदाम खाल्ल्यास शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT