Kiran Mane Buys Luxurious Car Instagram @kiranmaneofficial
मनोरंजन बातम्या

Kiran Mane Post: 'अखेर माझं स्वप्न पूर्ण झालं अन् ती घरी आली...', किरण माने यांनी खरेदी केली आलिशान मर्सिडीज कार

Kiran Mane New Car: किरण माने यांनी नवी कोरी आलिशान गाडी खरेदी केली आहे.

Pooja Dange

Kiran Mane Buys Mercedes:

अभिनेते किरण माने 'बिग बॉस मराठी ४'मुळे चर्चेत आले. बिग बॉसमुळे किरण माने यांच्या प्रसिद्धीत आणखी वाढ झाली. त्यांना अनेक काम देखील मिळू लागली आहेत. प्रसिद्धी झोतात आलेले किरण माने नेहमीच त्यांच्या पोस्टने चाहत्यांची मने जिंकत असतात.

नुकतीच किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये किरण माने यांनी त्यांच्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. या बातमीने किरण माने यांच्या चाहत्यांसह अनेकांना धक्का बसला आहे. चला तर पाहूया काय आहे किरण माने यांची पोस्ट.

किरण माने पोस्ट

अभिनेते किरण माने त्यांच्या पोस्टाने चाहत्यांसोबत त्यांचे अनुभव, आनंद आणि आठवणी शेअर करत असतात. आजच्या पोस्टमध्ये किरण माने यांनी त्यांचं लहानपणीच स्वप्न पूर्ण झालं असल्याचं सांगितलं आहे.

किरण माने यांनी नवी कोरी मर्सिडीज बेन्ज ही आलिशान गाडी खरेदी केली आहे. मर्सिडीजसोबतचा फोटो शेअर करत किरण माने यांनी लिहिले आहे की, 'मित्राने ही मोठी गोष्ट नाही... पण मला हा आनंद तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. जेव्हा ने किशोरवयात होतो तेव्हा मर्सिडीज बेंज माझं स्वप्न होत... आता ते सत्यात उतरलं आहे! माय डियर 'मर्स', तुझे आमच्या कुटुंबात स्वागत आहे.'

नेहमी मराठीच आग्रह धरणारे किरण माने यांनी ही पोस्ट मात्र इंग्रजीत लिहिली आहे. अभिनेत्री स्पृहा जोशीने किरण माने यांची ही पोस्ट लाईक केली आहे. तर अभिनेत्री मेघा धाडेने कमेंट करत किरण माने यांचे अभिनंदन केले आहे. किरण माने यांच्या पोस्टवर त्यांचे चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत. (Latest Entertainment News)

किरण माने 'मुलगी झाली हो' या मालिकेतील काम करत होते. किरण माने यांचे या मालिकेच्या निर्मात्यांशी खूप वाद झाले त्यांमुळे त्यांना मालिका सोडावी लागली. त्यानंतर त्यांना काम मिळणं देखील कठीण झालं होत. बिग बॉसमध्ये किरण माने यांना संधी मिळाली आणि त्यांचे नशीब चमकले असे म्हणायला हरकत नाही.

किरण माने अभिनय क्षेत्रात येण्याआधी स्वतःचे गॅरेज चालवत होते. मुलीच्या जन्मानंतर त्यांनी त्यांच्या गॅरेजला टाळ लावेल आणि अभिनय क्षेत्रात करियर करायचं ठरवलं. गॅरेजमध्ये काम करणाऱ्या या कलाकाराने आता स्वतःची आलिशान गाडी घेतली म्हणजे त्याने जग जिंकलं असंच म्हणायला हवं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT