Kiara Advani and sidharth malhotra image  Saam Tv
मनोरंजन बातम्या

कियारा अडवाणी सिद्धार्थ मल्होत्रासोबत दुबईत करतेय वाढदिवस साजरा; 'या' फोटोंमुळे चाहत्यांचा संशय बळावला!

कियारा अडवाणी तिचा वाढदिवस अविस्मरणीय करण्यासठी बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत दुबईला व्हॅकेशनसाठी गेली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी(kiara Advani) आज तिचा स्पेशल डे साजरा करत आहे. बर्थ-डे गर्ल कियारा आज ३० वर्षांची झाली आहे. कियारा अडवाणी तिचा वाढदिवस अविस्मरणीय करण्यासठी बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत(Sidharth Malhotra) दुबईला व्हॅकेशनसाठी गेली आहे. मधल्या काळात कियारा आणि सिद्धार्थच्या रिलेशनशिपबद्दल बऱ्याच गॉसिप्स व्हायरल झाल्या होत्या. परंतु अद्याप सिद्धार्थ आणि कियाराने त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे वक्तव्य केले नसल्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. पण आता कियारा तिचा वाढदिवस सिद्धार्थसोबत दुबईत साजरा करतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे चाहत्यांचा संशय आणखी बळावला आहे.

कियारा अडवाणी तिच्या व्यावसायिक जीवनाबद्दल जितके उघडपणे बोलते तितकेच ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणे टाळते. परंतु सिद्धार्थ मल्होत्रासोबत कियारा अडवाणीचे नाते किती खास आहे, हे तिच्या चाहत्यांना या फोटोंमधून पाहायला मिळत आहे. व्हायरल फोटोंमध्ये, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​दोन वेगवेगळ्या लूकमध्ये दिसले. एका फोटोत कियारा काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत ती टी-शर्ट आणि ट्राउझर्समधील कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे.

अलीकडेच, अनन्या पांडेने करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये कियारा आणि सिद्धार्थ यांच्यातील नात्याबद्दल खुलासा केला होता. जेव्हा करणने अनन्याला कियाराच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल विचारले तेव्हा तिने सिद्धार्थ आणि कियाराच्या 'शेरशाह' या सिनेमातील गाण गात 'उनकी रातां काफी लंबियां हैं' असे उत्तर दिले. त्यानंतर करणने कियाराचा 'रांझा' कोण असे विचारले असता स्वतः करणने 'वेक अप सिड' असे उत्तर देताच अनन्याने होकारार्थी मन हलवून या त्यांच्या नात्याबद्दलची पुष्टी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पाटोदा येथे मुंबई दौऱ्यातील पहिल्या मुक्कामाची जय्यत तयारी सुरू आहे

Patole Recipe : केळीच्या पानांत वाफवलेल्या गोड पातोळ्या; जाणून घ्या साधी सरळ रेसिपी

80s Style Shirt Designs: ८०s शर्ट डिझाइन्स पुन्हा ट्रेंडमध्ये! 'या' ७ रेट्रो स्टाइल्सने मिळवा हटके आणि स्टायलिश लूक

India Fort : तीन रहस्यमयी दरवाजे असलेला ऐतिहासिक किल्ला, प्रत्येक द्वारामागे दडलीय वेगळी गोष्ट

Amit Shah: समान नागरी कायद्यावर केंद्राचा मोठा निर्णय; मुंबईत अमित शहांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT