Khatron Ke Khiladi  Instagram/ @itsrohitshetty
मनोरंजन बातम्या

डर के आगे जित है..., Khatron Ke Khiladi 13 मध्ये उर्फीसोबत दिसणार 'हे' सेलिब्रिटी

'खतरों के खिलाडी १३'मध्ये कोणकोणते कलाकार असणार याची संभाव्य यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Khatron Ke Khiladi 13 Contestant: चित्रपट निर्माता रोहित शेट्टीचा लवकरच 'खतरों के खिलाडी' हा रिॲलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कधी पर्यंत हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार अद्याप हे गुलदस्त्यात असून या शो मध्ये कोणकोणते कलाकार असणार याची सध्या जोरात चर्चा आहे.

'बिग बॉस'च्या शोमधील ७ स्पर्धक 'खतरों के खिलाडी १३'मध्ये येणार असल्याची चर्चा सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या शोमध्ये कोणकोणते कलाकार असणार याची संभाव्य यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'खतरों के खिलाडी' या रिॲलिटी शोच्या 13व्या सीझनमध्ये यावेळी पुन्हा एकदा स्पर्धक धोकादायक स्टंट करताना दिसणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहिल्या स्पर्धकाचे नाव म्हणजे उर्फी जावेद. ती ही 'खतरों के खिलाडी १३'मध्ये दिसण्याची शक्यता आहे. निर्मात्यांनी उर्फीसोबत संपर्क साधला असल्याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. लवकरच ती दिसण्याची शक्यता आहे.

'बडे अच्छे लगते है'फेम राम म्हणजेच नकुल मेहता आणि दिशा परमार म्हणजेच प्रिया 'खतरों के खिलाडी १३' मध्ये सहभागी होऊ शकते. नुकतेच या जोडप्याने 'बडे अच्छे लगते है' शोचा निरोप घेतला.

रोहित शेट्टीने शालीन भानोतला 'बिग बॉस १६' मधील 'खतरों के खिलाडी १३' मध्ये सहभागी होण्याची संधी दिली. मात्र, शालीनने त्याची ऑफर नाकारली. आता तो त्याचा भाग आहे की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सोबतच, सुंबुल तौकीर खान, प्रियांका चाहर चौधरी आणि अंकित गुप्ता यांनाही शो ऑफर करण्यात आला आहे. तथापि, हे मंडळी या शो चा भाग असतील की नाही याबद्दल काहीही निश्चित केलेले नाही.

बिग बॉस मराठीचा विजेता शिव ठाकरेलाही 'खतरों के खिलाडी १३' मध्ये सहभागी व्हायचे आहे. या शोमध्ये जाण्याची इच्छा त्याने अनेकदा व्यक्त केली आहे. त्याचवेळी कॉमेडियन मुनावर फारुकीचे नावही समोर येत आहे, जो या शोमध्ये दिसणार आहे. याशिवाय अर्चना गौतम, सौंदर्या शर्मा यांच्याबद्दलही सांगितले जात आहे की, त्यांच्या सोबतही निर्मात्यांनी संपर्क साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाँग मार्चला सुरुवात, राजूर ते अहिल्यानगरपर्यंत जाणार मोर्चा

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी, पुण्यामध्ये वाहतूक मार्गात ७ दिवस मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?

Acidity VS Pitta: अ‍ॅसिडिटी समजून दुर्लक्ष करताय? पित्ताशयाचा असू शकतो धोका; तज्ज्ञांनी सांगितला नेमका फरक

Vastu Tips: घरात आजच ठेवा या ५ मूर्ती; लगेच उघडतील नशीबाचे दरवाजे, आर्थिक स्थिती सुधारेल

Bigg Boss Marathi 6 : रुचिता गेली विरोधात; विशालला बसला 440 व्होल्टचा धक्का, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT