Archana Gautam Injured Saam Tv
मनोरंजन बातम्या

Archana Gautam KKK13: शूटिंग दरम्यान अर्चनाला दुखापत, सोशल मीडियावर शेअर केली हेल्थ अपडेट

Archana Gautam Injured: ‘खतरों के खिलाडी १३’ अर्चनाला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.

Chetan Bodke

Archana Gautam Health Update: ‘खतरों के खिलाडी १३’ची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. या शोमध्ये सहभागी झालेली अर्चना गौतमबद्दल एक महत्वाची बातमी समोर आली आहे. टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना गौतम नेहमीच बिनधास्त आणि डॅशिंग वागण्यामुळे सर्वत्र चर्चेत आहे. बिग बॉसमध्ये देखील तिने स्वत:ची प्रतिमा तयारी केली होती. नुकतंच ‘खतरों के खिलाडी १३’ अर्चनाला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.

सर्व स्पर्धक फिनालेपर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत घेत आहेत. ‘खतरों के खिलाडी १३’ मधील अनेक स्पर्धक स्टंट करताना दिसत आहेत, अशातच स्टंट अर्चना गौतमला एक स्टंट करताना दुखापत झाली आहे. यापूर्वी शोमध्ये धक्कादायक स्टंट करताना, रोहित रॉय, ऐश्वर्या शर्मा, नायरा बॅनर्जी आणि अंजुम फकीह यांच्यानंतर आता अर्चना गौतमलाही स्टंट करताना दुखापत झाली.

Archana Gautam Injured

अर्चनाला ‘खतरों के खिलाडी १३’च्या चित्रिकरणाच्या दरम्यान मोठी दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. ती सध्या या मालिकेच्या चित्रिकरणासाठी द. अफ्रिकेतील केपटाऊनमध्ये आहे. सध्या तिथे शूटिंग सुरू असून शूटिंग दरम्यान तिचा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी अर्चनाच्या चेहऱ्याला दुखापत झाल्याची सुत्रांची माहिती आहे. तिला रुग्णालयातही दाखल करण्यात आले आहे.

Archana Gautam Injured

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये अर्चना गौतमला हनुवटीच्या खाली तीन टाके पडले आहेत. अर्चनाच्या या व्हायरल होत असणाऱ्या फोटोंवर देवोलिना भट्टाचार्जीने प्रतिक्रिया दिली असून ती लवकरच बरी होईल अशी आशा व्यक्त केली आहे. एका टास्क दरम्यान अर्चनाच्या चेहऱ्याला दुखापत झाल्याचे दिसून आले. अनेक चाहत्यांनी अर्चनाला आता आराम करण्याचा सल्ला दिला असून काहींनी तिला काळजी घेत शुटींग पासून ब्रेक घ्यावा असेही सुचवले.

अर्चनानं सोशल मीडियावरून शेयर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट करुन चिंता व्यक्त केली आहे. यावेळी अर्चनाने चाहत्यांसोबत रूग्णालयातील फोटो शेअर करत तिच्या प्रकृतीविषयी अपडेट दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरले! प्रिन्सिपलने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा घेतला चावा; गळा दाबून २० सेकंद हवेत उचलले

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा तडाखा; चाळीसगावजवळतच्या गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

Cholesterol medicine: सकाळी की रात्री? रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यानंतर कोलेस्ट्रॉलची औषधं कधी घेतली पाहिजेत?

Beauty Tips: डार्क अंडरआर्म्सपासून सुटका हवी? तर हे उपाय करतील मदत

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दिपकेंना फोन, लग्नाबाबत काय विचारलं? | Video

SCROLL FOR NEXT