Ketaki Chitale Got Bail From Thane Court Saam TV
मनोरंजन बातम्या

अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर; शरद पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने होती अटकेत

Ketaki Chitale Got Bail From Thane Court : केतकीच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता तिला याप्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे.

विकास काटे, साम टीव्ही, ठाणे

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणारे मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिला ठाणे न्यायालयाने जामीन (Bail) मंजूर केला आहे. केतकी ही सध्या ठाणे कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. केतकीच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता तिला याप्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. (Actress Ketaki Chitale Latest News)

हे देखील पाहा -

केतकीची फेसबूक पोस्ट -

अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिलं होतं. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त फेसबूक पोस्टनंतर १४ मे ला कळवा पोलीस स्टेशनमध्ये तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कळवा पोलीस स्टेशनमध्ये कलम १५३ ओ आणि ५०५ अंतर्गतगुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे केतकी ठाणे कारागृहात न्यायालयीन कोठडीत होती. आता तिला ठाणे कोर्टानं जामीन दिल्यामुळे तिला मोठा दिलासा मिळाला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pressure Cooker: स्वयंपाकघरातील कुकर किती दिवसांनी बदलावा?

Crime : ३ मुलींची इंस्टाग्राम Live वर हत्या, धक्कादायक घटनेनंतर जनसमुदाय भडकला, रस्त्यावर उतरले हजारो लोक

India vs Pakistan Final: फायनलसाठी टीममध्ये 'हे' दोन मोठे बदल होणारच; पाकिस्तानचा धुव्वा उडवण्यासाठी सूर्या सेना सज्ज

Swami Chaitanyananda Saraswati: १७ विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करणाऱ्या स्वामी चैतन्यानंदला अटक, पोलिसांनी पहाटे आवळल्या मुसक्या

Navratri 2025 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवीचे मंदिर, नवरात्रीत अवश्य घ्या दर्शनाचा लाभ

SCROLL FOR NEXT