ketki Chitle Saam Tv
मनोरंजन बातम्या

केतकी चितळे पुन्हा अडचणीत, शरद पवारांविषयी केलेली 'ती' पोस्ट पडणार महागात

केतकी चितळे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिने असेच काहीसे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई - मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitle) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ती तिच्या वक्तव्यांमुळे अनेकदा अडचणीत देखील सापडली आहे. आता केतकीने पुन्हा एकदा असेच काहीसे वक्तव्य केले आहे. यावेळी तिने तिच्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षापार्ह शब्दात पोस्ट शेअर केली आहे.

अ‍ॅडव्होकेट नितीन भावे नावाच्या एका व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकी चितळेने आपल्या फेसबुकवर शेअर केली आहे. शरद पवारांनी जवाहर राठोड यांच्या कवितेच्या अनुषंगाने केलेल्या वक्तव्याबद्दलची ही पोस्ट असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आता तिच्यावर कळवा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पाहा -

केतकीची फेसबूक पोस्ट...

दरम्यान, याआधी देखील केतकी एका पोस्टमुळे अडचणीत सापडली होती. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही तिने वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर ती वादात सापडली होती. त्यावेळीही शिवप्रेमींनी तिला ट्रोल केले होते. त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली होती. तर आता शरद पवारांविरोधात केलेल्या या फेसबुक पोस्टनंतर तिच्यावर कळवा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Symptoms: अचानक वजन वाढतंय, चाललं की दम लागतो? तुम्हाला Diabetes तर नाही ना? लक्षणे जाणून घ्या

Maharashtra Live News Update: मुंबई- गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, प्रवाशांचे हाल

Gold Price: दिवाळी पाडव्याच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळे ३३,८०० रुपयांनी झालं स्वस्त; वाचा आजचे दर

Anganwadi Workers Payment : अंगणवाडी सेविकांची भाऊबीज हुकली, अंगणवाडी सेविकांचे पालिकेकडे साकडं; कधीपर्यंत मिळणार पगार?

Balushahi Recipe: भाऊबीज स्पेशल मिठाई, घरच्या घरी तयार करा हलवाईसारखी गोड बालुशाही, वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

SCROLL FOR NEXT